नवीन लेखन...

परदेशीय मराठी कुटुंबातली गृहस्वामिनी

आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि  ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्‍या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं […]

कॅलिफोर्निया

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्निया हे राज्य वसलेले आहे. यात उत्तरेला सॅनफ्रान्सिस्को तर दक्षिणेला मेक्सिकोची सीमा चिकटली आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर. यात लॉस एंजलीस, सांता बारबारा, आरवाईनसारखी शहरे. […]

तुळस

पाच हजार वर्षे उलटून गेली पण अगदी तेव्हापासून तुळस ही अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत वाढते. आयुर्वेदात संस्कृतमध्ये तुळशीला गुलाघ्नी असे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये याला ‘बासील’ असेही म्हणतात. तुळसही एक धार्मिक उपचार असून ती घरोघरी लावलेले असते. खेडेगावात प्रत्येकजण आपले स्वतःचे घर बांधले तर एक तुळशी वृंदावन बनविण्याची प्रथा असते. तेथेच आपली एक तुळशीचे रोप घेऊन त्याची रोज सकाळी पूजनेनंतर तबकात हळद, कुंकू, फुले घेऊन घरातील महिला तुळशी वृंदावनकडे जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात व सूर्याला अर्ध्य देतात. […]

अमेरिकेतील कामगार चळवळीतील क्रांतिकारक ऐतिहासिक नेतृत्व मदर जोन्स

अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती. […]

भरजरी आठवणी

१९३३ सालातील ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत, या ५ दिवसांत साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ कादंबरी लिहून काढली. […]

स्वामी विवेकानंद- भाग ३

स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं. […]

माध्यम शिक्षण

कोण म्हणत पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणात जायला शिक्षणच हवे असते.. आणि काय गरज आहे पत्रकार म्हणजे चांगला शिकलेला, विचारवंतच असला पाहिजे. दोन्ही वर्गातील लोकांनी काही बोलले, काही लिहिले की, समाजाला नवीन दिशा मार्ग दाखवला जातोच की, खरंच! काय गरज आहे का पत्रकार शिकलेला असण्याची. […]

गणपतीच्या आठवणी

गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं. […]

नकोत नुसत्या भिंती

वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे. […]

मुळा

भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात. […]

1 25 26 27 28 29 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..