नवीन लेखन...

तुळस

पाच हजार वर्षे उलटून गेली पण अगदी तेव्हापासून तुळस ही अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत वाढते. आयुर्वेदात संस्कृतमध्ये तुळशीला गुलाघ्नी असे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये याला ‘बासील’ असेही म्हणतात. तुळसही एक धार्मिक उपचार असून ती घरोघरी लावलेले असते. खेडेगावात प्रत्येकजण आपले स्वतःचे घर बांधले तर एक तुळशी वृंदावन बनविण्याची प्रथा असते. तेथेच आपली एक तुळशीचे रोप घेऊन त्याची रोज सकाळी पूजनेनंतर तबकात हळद, कुंकू, फुले घेऊन घरातील महिला तुळशी वृंदावनकडे जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात व सूर्याला अर्ध्य देतात. तसेच सायंकाळी मुले अथवा मुली देवाजवळ येऊन प्रार्थना करतात. तेव्हाच तुळशी वृदांवनात जाऊन आई दिवा लावते व मुले सर्वांना नमस्कार करतात व म्हणतात, माझा नमस्कार तुळशीपाशी, सर्व नमस्कार देवापाशी, अशी प्रार्थना करून सर्व श्रेष्ठ लोक व लहानांना नमस्कार करतात. ही त्यावेळची परंपरा मग बदलत चालली व सर्व विसरून गेले. परवाचा वगैरे फारच दूर राहिले. तसेच शेवटी दिवाळी आटोपल्यावर तुळशीचे लग्न अगदी काहीजण थाटात करतात.

आयुर्वेदाप्रमाणे तुळशी रात्री झोपतानाही प्राणवायू सोडते. यात बरेच वृक्षही प्राणवायू सोडतात ते म्हणजे पिंपळ, वड वगैरे त्यामुळे जर एकट्याने जर तुळशीच्या झाडाजवळ झोपलात तर झोप चांगली लागते. एवढेच नाही तर घरामध्ये जर तुळशीची एखादे रोप लावले तर डास अथवा इतर बारीक किटक येत नाही. तसेच जर डासांचा त्रास होत असेल तर डास अजिबात चावत नाही. आयुर्वेदात तुळशीला वैद्यकीय गुण भरपूर असतात. जर श्वसनाचा त्रास होत असेल तसेच दमा अथवा छातीचा त्रास होत असेल तर निश्चितपणे फायदा होतो. म्हणूनच याला दैवी चमत्कार असेही म्हणतात. जर घरात पाण्याचे भांडे भरले असेल तर यात दोन थेंब तुळशीच्या रसाने असेल तर वरील पाणी शुद्ध होते. त्याचप्रमाणे जर एकादे तुळशीचे रोप आपल्या खोलीत ठेवले असेल तर सर्व सूक्ष्म जंतू वगैरे नष्ट होतात. त्याचप्रमाणे खोकला वगैरे आराम मिळतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुळशीचे रोप आपण जवळ ठेवल्यास त्यात अनेक जंतू अथवा इतर संसर्गरोगापासून मुक्ती मिळते. हा नुसता भावनेचा प्रश्न नाही तर ही एक फार मोठी देणगी आपल्याला मिळाली आहे.

तुळशीच्या पानापासून आपल्याला तेल काढता येते या तेलातही भरपूर फायदे होतात, असे चरक संहितेमध्येही सांगितले आहे. तुळशी तेलाने जर विषमज्वर अथवा तथाकथित काही व्याधी तयार असेल तर यात चार थेंब जीभेवर ठेवले असल्यास ताप खाली येतो. या तेलाचा उपयोगावर सांगितल्याप्रमाणे श्वसनक्रिया अथवा दमा सुधारतो. एवढेच नाही तर कॅन्सर बरा होऊ शकतो, परंतु कॅन्सरपासून झालेल्या यातना मात्र त्वरित थांबतात, तसेच तोंड येणे अथवा जिभेवर फोड येणे, याने तुळशीच्या रसाने त्वरीत आराम मिळतो. तसेच एखाद्याला मुतखडा झाला असेल तर तुळशीच्या रसाने आराम मिळतो.

तुळस दोन प्रकारची असते. एक श्याम तुळस तर दुसरी कृष्ण तुळस. शाम तुळशीला साधारण तपकिरी रंगाची असते तर कृष्ण तुळस ही साधारण काळ्या रंगाची असते. श्याम तुळस कधी हिरवट रंगाची ही असू शकते. मात्र दोन्ही गुणधर्माने सारख्याच असतात.

मात्र एक अडचण येते. तुळशीचे तेल फार क्वचितच मिळते. आणि सर्वात म्हणजे तुळशीच्या तेलाचा पाश्चिमात्य देशात मसाज वापरात आणि याचा उपयोगही तितकाच चांगला असतो. तुळशीचा दुसरा फायदा म्हणजे तुळस उन्हाळ्यात सुकवून वाळत ठेवावी. त्याचप्रमाणे ही पूड वस्त्रगाळ करून डब्यात भरून नेहमी एक बारीक चमचा जेवणानंतर अथवा रात्री खाल्ल्याने सर्व तक्रारी दूर होतात. तसेच अर्धशिशी (मायग्रेन) अथवा रक्तदाब वाढत असेल तर एक चमचा तुळशीचा रस घेतल्याने निश्चितच आराम मिळतो. तसेच उतारवयात जर दररोज अर्धा चमचा तुळशीच्या रसाने चोळल्यास चेहऱ्यावरील सुरुकुत्या नाहीशा होतात. हा गुण आवळ्यानेसुद्धा येतो. जंतूमुळे पुटकुळ्या (रॅश) असेल तर चार पाच तुळशीची पाने चुरगळून केल्यास कांती परत स्वच्छ अन मूळ स्वरुपात होऊन जाते.

आजच्या एकविसाव्या शतकात जर न्यूक्लीअर रिअॅक्टरमुळे अणुभट्टीमुळे जर कोठे कातडीवर चट्टा पडत असेल तर ताबडतोब तुळशीचे तेल लावावे, असे पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी यांनी तोडगा म्हणून दिला आहे. कुठेही जखम अथवा ऑपरेशन करून एकादी उघडी जखम केल्यास यात तुळशीच्या तेलाने अथवा रसाने खचित फायदा होतो.असे हे गुणकारी झाड तुळस. कुठेही वापरावे. घरातदेखील आपल्या झोपायच्या खोलीत लावल्याने डासाचा उपद्रव नाहीसा होतो. घरात एक अथवा दोन तीन लहान कुंपणाचाही फायदा होतो. अशा तुळशीचा खूपच फायदा आहे.याने कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही.

आयुर्वेदात सांगितलेली पहिला गुणधर्म

. जखम भरून निघणे: जर कुठे कोणी पडला अथवा फार मोठी जखम झाली आणि त्याचप्रमाणे रक्तस्राव होत असेल तर तुळशीच्या रसाने जखम भरून निघण्यास मदत होते.

. सर्दी ताप पडसे वगैरे: जर एखाद्याला सर्दी अथवा ताप आल्यास तुळशीचा काढा करून देतात. यात तुळशीची चार पाच कोवळी पाने त्यात काळ्या मनुका, सुंठे, ज्येष्ठमध हे चार ते पाच पाण्याबरोबर उकळून त्याचे निदान चार पाणी करावे व पिण्यास देणे, यामुळे सर्दी व खोकला निश्चित बरा होतो.

. छातीवर कफ साचणे: आयुर्वेदात कोणत्याही अनेक औषधाला कफ व खोकला येतो. याकरता दररोज चार ते पाच पाने चावून दिवसातून तीन ते चार वेळा करावे. त्याने कफ निघून जातो.

. घसा बसला असल्यासः चार पाच तुळशीची पाने ही उकळून थोडे आटवावे व पिण्यास दिल्यास त्वरीत आराम मिळतो.

. श्वासोच्छवास होत असेल तरः श्वासोच्छवास होत असेल तर जंतूप्रमाणे चांगला उकळवून काढा करावा.

. मुतखडाः मूतखड्याने त्रास होत असेल तर एक चमचा तुळशीचा रस दिवसातून तीन ते चार वेळा घेतल्यास खडा हळूहळू निघून जातो.

. छाती भरून येणे: कोणात्याही अतिविचाराने छातीवर खूप दडपण येते, अशा वेळेला जर एखाद्या रोग्याला दहा, बारा तुळशीची पाने चावायला दिल्यास हे दडपण आपोआप निघून जाते.

. तोंड आल्यासः तोंड आल्यास अथवा जिभेवर फोड आल्यास जिभेवर चार थेंब तुळशीचा केल्याने तोंड ताबडतोब नाहीसे होते.

. किटक चावल्यास: कोठेही किटाणू चावला तर तुळशीची चार पाच पाने जखमेवर चोळल्यास त्वरित आराम मिळतो.

१०. कोठेही नायटा अथवा जंतूसंसर्ग झाल्यासः जसे गजकर्ण वगैरे तर तुळशीच्या रसावर चोळून हा नायटा जागेवर चोळावा. हे दिवसातून दोन तीन केल्यास त्वरित आराम मिळतो.

११. दात दुखी: फार दाढ अथवा इथर दात दुखणे अथवा हाताने दाताने रक्त येत असल्यास तुळशीची चार-पाच पाने त्यात थोडे रस घेऊन दातास चोळावे. रक्त ताबडतोब थांबते.

१२. डोकेदुखी: चंदनाची पावडर यात थोडे तुळशीचा रसाचा लेप लावून डोके सावकाश थांबते.

१३. डोळे येणे अथवा डोळे चुरचुरणे: डोळे लाल होत असतील अथवा डोळ्याची आग होत असेल तर तुळशीच्या रसाचे दोन थेंब डोळ्यात टाकावे त्वरीत आराम मिळतो.

१०० ग्रॅम तुळस घेतल्यास त्यात खालील गुणधर्म आढळतात.

-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..