नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

निरुपण

आपल्याला आयुष्यभर विश्वात, आसमंतात, अवकाशात असलेल्या सजीव..निर्जीव प्राणीमात्र आणि अणु _रेणू यांच्या मुलभूत घटकांबद्दल सारं सारं काही जाणून घेण्याची जिज्ञासा असते..नव्हे या साऱ्या ज्ञानाचा ठेवा जास्तीत जास्त आणि सर्वात पहिले आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येकाची चढा ओढ चालू असते..माणसाची हि जिज्ञासा माणसाच्या युगानुयुगे चालेलेल्या प्रवासात मैलाचे दगड होऊन माणसाचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी दिशादर्शक बनून अजरामर झाल्याचे आपल्याला इतिहासातील प्रत्येक पानावरील नोंदीत आढळून येते. […]

दुर्गुण

आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. […]

मनाची श्रीमंती

माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही. […]

वेदना

‘वेदना ” वेदनेशी असलेल नाथ कधीच तोडायच नसत,ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आणि पर्यायाने दुसर्याच्या दुःखाशी वेदनेन बघायला शिकवते |. वेदना जगण्याचा भुत ,भविष्य ,विसरून वर्तमानासी एकरूप व्हायला शिकवते .स्वताच्या वेदना ,दुःख याच्यापलिकड़े असलेल्या तीव्र आणि भयानक सामाजिक वेद्नेशी नात जोडायला शिकवते ,जगन कधीच पूर्ण होत नसत ,जगण्याच्या मैदानात वेदनेच नाण अखंडपने खनानत असत क्षणभंगुर सुखाच्या शक्येतेचा […]

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते. […]

दिवाळीत जपू या सामाजिक भान

दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे. […]

माणुसकीचे विकृतीकरण

हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि.. […]

हातात हात…

‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. […]

‘नॅक’चे शिवधनुष्य

जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल. […]

आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक

समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे. […]

1 77 78 79 80 81 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..