भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्वही विचारात घ्यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्कृतच्या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री ह्या भाषा अस्तित्वात होत्या. […]
आपण भाषेच्या शुद्धपणाचा परकीय भाषेच्या संदर्भात विचार केला. आतां आपण त्याचा विचार लोकभाषेच्या दृष्टीकोनातून करूं या. त्यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्व नाहीसं करून टाकील, असा निष्कर्ष निघतो कां तें. आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्यांची भाषा असते. तिला प्रतिष्ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्व टिकून राहतं. […]
लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. […]
मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? जर साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते हो फक्त इतकेच. मग असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते. […]
आज सिमेंट च्या जगलात माणूस नुसता कोडातलाय त्याला रात्र न दिवस फक्त आणि फक्त पैसा एके पैसा च दिसतो बारा बारा तास काम करून येऊन साधी झोप पण नीट घेईना झालाय आजच माणूस. […]
आमची संस्कृती नष्ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्या संस्कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्हणूनच आमची संस्कृती व आमची भाषाही नष्ट होण्याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. […]
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]
जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. […]
आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]
कुटुंबात नव्या सोयीसुविधा आल्या तशीच करमणुकीची नवीन साधनेसुध्दा आली. ज्ञानार्जनास उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळू लागली. व्हिडिओद्वारे गॅजेट्स वापरण्यास मार्गदर्शन होऊ लागले. काही सुविधांमुळे शारिरिक श्रम कमी होऊ लागले. तांत्रिक प्रगतीचा हा झंझावात शरीरास विश्रांती व मेंदूस विरंगुळा देता देता, शरीरास आळशी व मेंदूस व्यसनी केव्हा बनवू लागला हे कळले नाही. […]