देशद्रोहासम गुन्हा दाखल करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवरुन बाहेर पडून, स्टेशनच्या पश्चिमेकडील रस्ता ओलांडून अंजुमन-ई-इस्लाम शाळेपाशी उतरणारा पादचारी पुल काही दिवसांपूर्वी पडला.

हा पुल काही फार जुना नसावा. पुलाच्या बांधकामावरुन तो देशी साहेबांनीच बांधला असण्याची शक्यता जास्त. शक्यता कशाला, खातरीच आहे म्हणा ना..! कारण इंग्लंडातल्या विदेशी साहेबांनी, एस्टीमेटपेक्षा कमी किंमतीत त्याकाळात केलेली बांधकामं, सध्याचा पूर्वीपेक्षा किततरी पटीने वाढलेला भार सहन करीत अजुनही सक्षम सेवा देत आहेत. तुलनेनं नवीन बांधकाम पडतं म्हणजे ते देशी सायबांनी, वाढीव एश्टीमेटातील वाढीव टक्केवारीकडे लक्ष ठेवून केलेलं ते काम असावं, याची मला तरी (अनुभवांती) शंका नाही. टिव्हीवरच्या बडबड्या उथळ ताई आणि दादा मात्र हा ब्रिज १००-१५० वर्षांपूर्वीचा आहे असं Braking News म्हणून Barking करुन करुन ओरडत आहेत (Braking News या शब्दांना म्हणून मी Barking News म्हणतो, ते एवढ्यासाठीच).

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस आठवतोय का? याच दुर्दैवी दिवशी पाकिस्तानी अतिरेकी इस्माईल खान आणि अजमल कसाब यांनी सीएसएमटी स्टेशनात निरपराध प्रवासी व काही पोलीस अधिकाऱ्यांचा बळी घेतला होता व त्यांनी या पुलावरुनच पलिकडे जाऊन पुढे कामा हाॅस्पिटलाच्या गल्लीत हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांचा बळी घेतला होता. कसाबने बंदुका आणि स्फोटकांच्या आधारे हत्या केल्या होत्या, त्या घटनेला हा ब्रिज साक्ष होता.

या पुलाचं नेमकं नांव काय ते माहित नाही, पण २६.११च्या घटनेपासून हा ब्रिज लोकांमधे ‘कसाब ब्रिज’ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. वास्तविक कसाबने घडवलेल्या हत्याकांडात या निर्जीव पुलाचा काही दोष नव्हता, पण तो उगाचच एका अतिरेक्याच्या नांवाने प्रसिद्ध झाला.

पुलाने आज पाच निरपराध पादचाऱ्यांचा पुन्हा बळी घेतला. या दुर्घटनेतही या निर्जीव पुलाचा काहीच दोष नाही. दोष असलाच तर महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे या सर्व लक्ष टक्केवारीकडे ठेवून काम करत असलेल्या सरकारी यंत्रणांचा. (आताच टिव्हीवर एकमेंकावर दोष ढकलण्याचा यांचा निर्लज्ज तमाशा पाहिला आणि या सर्वांची मला ओकारवाणी किळस वाटली).

कसंही असलं तरी, कसाब हा आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेला एक विदेशी अतिरेकी होता. निरपराध नागरीकांचा बळी घेऊन दहशत बसवणं हा त्याचा स्पष्ट उद्देश होता. पण आपल्या नागरीकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन त्यांना जीव गमावायला भाग पाडणाऱ्या, वरुन तो मी नव्हेच टाईप कसाबसारखाच तमाशा करणाऱ्या आपल्या यंत्रणा, त्यात बसलेले भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे घडलेली ही दुर्घटना मला कसाबने २६.११ ला घडवलेल्या अतिरेकी हत्याकांडापेक्षा पेक्षा कमी वाटत नाही. मग ही दुर्घटना, दहशतवादी घटना मानली जायला काय हरकत आहे?

जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा.

हिच घटना नव्हे, तर देशात यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील, तिथे तिथे अशाप्रकारचे गुन्हे दाखल व्हायला हवेत.. असं जो पर्यंत होत नाही, तोपर्यंत असे नरबळी पुन्हा पुन्हा जात राहाणार..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…