About रजनीकान्त महादेव शेंबडे
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

आता मी परका

अंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका काळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका बेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती फुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका श्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे मनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका स्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने बोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता […]

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – ३

माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य… […]

आपण आणि आपले जगणे

या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले. […]

शोध

आता पुन्हा एकदा कृष्णविवरात काळ्या मांजराचा शोध आता पुन्हा एकदा मिटत जाणाऱ्या पानात तारखांचा शोध आपल्याच प्रत्येक चुकलेल्या खेळीला कुठे हक्काचा खांदा कापलेल्या दोराची शिदोरी स्वर्गाला मिठीसाठी शिडीचा शोध आयुष्याचा सारीपाट आणि डावास सुरुवातीस फितूर फासे प्रत्येकाचं वेगळे महाभारत नि स्वतःसाठी कवचकुंडलाचा शोध प्रत्येकाचा तळहात रेघ नि रेघ असते नियतीशी स्वतंत्र करार गुलामांना अधिकार मृत्युपत्रावर सहीचा […]

आत्म्यास शांती लाभो

वांझ आसवांच्या श्रद्धांजली आत्म्याच्या शांतीसाठी.. वाहण्याची चढाओढ पाहताना अंगावरला एक एक कपडा उतरला जातो. रोज रोज मरणयातना भोगणारी माणसे .. मरण येत नाही म्हणून जगत असतात. आणि त्यांच्या उजाड आयुष्याच्या कॅनव्हास वर आपल्या आयुष्याची मानपत्रे लिहून घेणारी बेगडी जात आपली शेज सजवीत असते.. आपल्या आयुष्याचा ऱ्हस्व_दीर्घ विसरलेल्या माणसांच्या पिढ्यान_पिढ्या जिवंत ठेवण्याचा कुटील डाव खेळण्यात धूर्त कावेबाज […]

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – २

२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा पसाभरही काही न्यायचा परवाना नाही ………या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आपल्याला आपलं नाव का बरं कोरता येऊ नये—–सतत काहीतरी मागणं मागत राहायचं […]

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – १

१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.— गणित हा सरावाचा […]

सदरा

शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा […]

आयुष्याची प्रश्नपत्रिका…

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]