नवीन लेखन...

आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक

समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. त्यात पुढील गोष्टी आवश्यक आहेत.

1) समाजाचे रक्षण करणे हा प्रमुख हेतू शिक्षा देण्यामागे असावा. प्रतिबंधक कारवाई महत्वाची आहे. संपूर्ण अपराधाचे उच्चाटन अशक्य आहे. अपराध्यांना गुन्हा करण्याची संधीच मिळणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्यामध्ये परिस्थितीनुसार शिक्षेकरता जुळवून घेण्याची तरतूद असावी.

2) प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ श्रीयुत बेथाम म्हणतो ‘शिक्षा देण्याचे धोरण अखेर दु:ख आणि सुख’ याचेशी समतोल असावे. आरोपाचे गांभिर्य लक्षात घेऊन शिक्षा आणि परिणामकारक होण्याकरता त्या दृष्टीने प्रमाणबद्ध असावी.

3) न्यायालयीन तत्त्व ‘न्यायास उशीर म्हणजे न्याय नाकारणे होय.’ मान्य केलेच पाहीजे. त्यामुळे निकाल देण्यास उशीर झाला म्हणजे शिक्षेचे गांभिर्य / परिणाम नाहीसा होतो. भारतामध्ये केसेसचा निकाल उशीरा होतो त्यामुळे सर्वसाधारण जनतेचा न्यायसंस्थेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.

4) विशिष्ट मानवी कृत्याचा तिरस्कार व्यक्त करणे म्हणजे शिक्षा तर आवश्यकच असते. कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा दिल्यानेच समाजाला संरक्षण मिळत असते. तत्त्वज्ञ श्रीयुत बॅकेरिया म्हणतो त्याप्रमाणे ‘शिक्षेचा उद्देश अपराध्याला जाणीव करून देत असते की त्याने केलेले कृत्य योग्य नव्हे.’

5) समान अपराधास समान शिक्षा हे तत्व सर्वच गुन्हेगारांना लागू पडत नाही. तरुण प्रथम अपराध्यास इतर जास्त वयाच्या निर्ढावलेल्या अपराध्यापेक्षा वेगळी वागणूक पद्धत आवश्यक आहे. आरोपीचे वय, पुरुष अगर स्त्री, त्याची मानसिकता, समाजातील परिस्थिती वगैरे घटक लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते. याचकरता गुन्हेगारांचे वर्गीकरण आवश्यक आहे.

6) शिक्षेच्या संदर्भातील महत्वाचे घटक पोलीस आणि न्यायाधीश यांचेबद्दल समाजात आदराची भावना निर्माण होईल अशा पद्धतीने निर्णय व्हावा म्हणजे त्यांची विश्वासाची भावना वाढेल.

7) गुन्हेगाराची सुधारणा व्हावी हा शिक्षा देण्यामागे उद्देश असावा म्हणजे अल्पवयीन आरोपी, स्त्रिया, प्रथमच अपराधी यांच्या संदर्भात शिक्षा सौम्य असावी, तर निर्ढावलेल्या अपराध्यास कडक शिक्षा द्यावी.

8) कमी शिक्षा द्यावी, सुधारणा करावी या धोरणाचा फार अतिरेक होऊ नये, ते जास्त ताणले जाऊ नयेत. अलिकडे खुले तुरुंग – भरपूर सुविधा दिल्या जातात त्याचा विचार होणे फार गरजेचे आहे. कारण तुरुंगामधील सुविधा सोई म्हणजे पृथ्वीवरीस स्वर्गच झाले आहेत. त्यामुळे अपराधी लोक आराम करण्याकरताच येथे जीवन घालवितात. त्यामुळे कडक शिस्त, श्रम येथे आवश्यक आहेत. अशा सुखसोईमुळे अपराध्यांवर वचक राहत नाही. अशा अतिरेकी सुधारणा वेडामुळे (Reformative) शिक्षेचा परिणाम होत नाही. गुन्हेगाराची प्रतिमा जास्त भव्य करू नये. खुनासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना पकडून देणाऱ्यास रोख बक्षिसे जाहीर करणे म्हणजे शिक्षाशास्त्राचा अवमान करण्यासारखे आहे. प्रत्यक्ष उदाहरण द्यावयाचे म्हटले तर श्रीयुत कल्याण मुखर्जी यांच्या पुस्तकामध्ये (”The story of Bandid King”)

दरोडेखोर मलखान याला दिलेली अवास्तव प्रसिद्धी तसेच (Bandit Queen) फुलनदेवीला दिलेली प्रसिद्धी आणि तिच्यावर काढलेले पिक्चर म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरणच होय. मध्यप्रदेशातील भिंड येथे 12 फेब्रुवारी 1983 रोजी मुख्यमंत्र्यांसमोर तिने पत्करलेली शरणागती आणि त्याला दिलेली प्रसिद्धी आणि नंतरची प्रखर टीका हे ज्वलंत उदाहरण आहे. फुलनदेवीवर काढलेला चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर बराच गाजला. प्रसिद्धी मिळाली. तिच्या पूर्वीच्या खुनांचे, गंभीर अपराधाचे जणू कौतुक केले गेले. विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डाने सन 1995 सप्टेंबरामध्ये संमती दिली. काही राजकीय पक्षांनी तिला भरपूर महत्व दिले आणि एक सेनेची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि बहुजन समाज पार्टीतर्फे, ब.स.पा.तर्फे 11 आणि 12 व्या लोकसभेला खासदार म्हणून निवडून देखील दिले. हा इतिहास म्हणजे शिक्षेच्या मूलभूत तत्वांची पायमल्लीच केली असे दिसते.

भारतीय शिक्षाशास्त्र धोरण: (Penal Panel Policy In India) :

आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे. अँग्लो अमेरिकन धोरण स्वीकारले आहे. भारताची तशी स्वत:ची शिक्षा यंत्रणा पुरातन कालापासून स्वतंत्र आदर्शच आहे. ‘बृहस्पती शास्त्र’ या ग्रंथात योग्य त्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याप्रमाणे लोकनीती काय म्हणते याचा विचार करणे सुचविले आहे. कौटिल्याने त्याचे अर्थशास्त्रात उपयुक्त सूचना, मार्गदर्शन केल आहे. कौटिल्याने म्हटले आहेच की, ‘कडक शिक्षा माणसाला भीती दाखवते, तर मवाळ, सौम्य शिक्षा त्याची मानसिक चौकट बिघडवून निराशावादी बनवितो. पण योग्य शिक्षा दिल्यास अपराधी धार्मिक चांगला बनतो.’ गुन्हेगारास योग्य मार्गावर आणणे हे ध्येय असते. ब्राह्यणवर्गास श्रेष्ठत्व दिले होते. त्यांच्या शिक्षेत सवलत, सूट असे कारण त्यांना आध्यात्मिक पुढारी (Spiritual Leader) आदर्श मानले जात असे. ब्राह्यण आरोपीस फाशी न देता त्याचे डोक्याचे फक्त मुंडण केले जात असे. त्यानंतर ब्रिटिश काळात काही वर्षे शिक्षेत सवलत मिळत असे पण त्यानंतर भेदभाव रद्द झाला.

— अॅड. प. रा. चांदे
नाशिक ४२२००९

— “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..