नवीन लेखन...

अंधश्रध्दा निर्मूलन : प्रश्न, आक्षेप, मर्यादा व अपेक्षा

संस्कृती, धर्म चिकित्सा न केल्यामुळे चिकटून बसतात, कलम केलेल्या झाडाप्रमाणे, मुळाकडून रस शोषून वर खोडाकडे पाठविला जातो. बुंधा राबतो, फुलं बहरतात, आपण राबतो तो आपल्याच फुलांसाठी. ९०% लोकांत असच कलम केल असते. एका मेंदूत दुसऱ्या मेंदूचे कलम केले जाते. सनातनी विचारांविरुध्द बंडखोरी जुन्या काळातही होती. गौतम बुध्दांच्या मते ईश्वर आहे नाही या वादापेक्षा माणसाचे दु:ख जाणणे महत्वाचे. परंपरा तपासून घेतलेल्या नसतात. एकाने दुसऱ्याला सांगितलेल्या असतात. चिकित्सा न केलेले ज्ञान स्वीकारणे योग्य नाही. खिळे मारल्यासारखे संस्कार घट्ट रुतणार नाहीत, संस्कार रुजवायला हवेत, बहरायला हवेत, बहरण्याची क्रिया सुगंध देते, आसमंत दरवळून टाकते.

शोषणाविरुध्द अंधश्रध्दा निर्मलून आवश्यक. आपली बुध्दी दुसऱ्याकडे गहाण न दुखावता अंधश्रध्दा घालवता येतील का? परमेश्वराची जळमटं मेंदूतून साफ केली पाहिजेत हा विचार किती जणांना रुचेल? अंधश्रध्दा निर्मूलनाची फलनिष्पती ‘Disease is not Curable, but Death is Painless’ ही आहे. निर्मूलन झाले नाही तरी जागृतीही खूप महत्वाची असते. ती जाणीव देते व जाणीव जीवन असह्य करते. विकासात परमेश्वराला स्थान आहे का विज्ञानाला? अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रमामुळे मानसिकता बदलत आहे. पशुहत्या कमी होत आहे. बुआ उघडे पडत आहेत. चमत्कारामागचे विज्ञान कळत आहे. चमत्कार, बुवाबाजी, भूत-भानामती, फलज्योतिष, पशुहत्या, जटा येणे याविरुध्द आवाज उठवणे सोपे नाही. लोक ऐकत नसताना, पटवणं अवघड आहे. कायमस्वरुपाचे अंधश्रध्दा निर्मूलन होणार नाही हा एक आक्षेप आहे. गरिबी हटावमध्ये गरिबी हटली काय? प्रयत्न ५००० वर्षांपासून चालू आहेत. विवेक जागर कमी पडतो असेही म्हटले जाते. नेते, कार्यकर्ते कमी पडतात. संघटनेला Labour व Glamour पुढे नेत असते. कार्यकर्ते व लोकांना करिष्मा आवश्यक असतो.

गर्दीसमोरील भाषणादी उपक्रमामध्ये चमकदार विधानाद्वारा श्रोत्यांवर जबाबदारी न टाकता कृतिहीन दाद घेण्याची क्षमता असते. पण त्याचा उपयोग मतपरिर्वतनाला कितपत होईल याविषयी काहींना साशंकता वाटते. चमकदार विधानाने सत्तांतर, मतांतर होऊ शकते. ‘अनिस’ ने अनेक प्रयोग सिध्द केले. लाखोंची आव्हाने दिली, मार खाल्ला विरोध केला, सत्यसाईबाबांची हातचलाखी कॅसेट काढली, चमकदार विधाने करण्याचा जमाना आहेच. भावनगरचा भाव कमी केला, पार्वतीअम्माला अटक व्हावी, अंनिसचा कायदा व्हावा असे अनेक प्रयोग चालू आहेत. कार्यकर्त्यांचे मनुष्यबळ हळूहळू वाढेल, वाढत आहे. मतपरिवर्तनासाठी एखादी पिढी बरबाद होते.

अंनिसचा निष्क्रिय कार्यकर्ता म्हणून टिका करणं सोप आहे. सक्रिय होऊन पाहा, बोलून पाहा, करुन पाहा, उद्दिष्ट्ये विशिष्ट चौकटीतच बंदिस्त केली की कार्यालाही मर्यादा पडतात आणि ती चौकट संदिग्ध आखली की वैचारिक भूमिकेविषयी प्रश्न उद्भवतात हा एक आक्षेप आहे. कुठे तरी थांबण्यासाठी, निश्चित ठरविण्यासाठी चौकट आवश्यक, सीमारेषा आवश्यक. उद्दिष्ट्ये संदिग्ध असली की, वैचारिक भूमिकेविषयी प्रश्न पडतात, चौकटीमुळे नव्हे. एकाच संघटनेत भिन्न विचार यामुळे संभ्रम निर्माण होतो. कार्यकर्त्यांना निश्चित निर्मूलन करायचे दुखावता अंधश्रध्दा निर्मूलन करायचे असल्यामुळे कार्यकर्त्यांबद्दल कठोर भूमिका घेता येत नाही. समाजाची मानसिकता हळूहळू बदलते. समाज उत्सवप्रिय असतो. अशा परिस्थितीत कोणकोणती धार्मिक कृत्ये करावीत? आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. सत्यनारायणाच्या पूजेच्या कथेबद्दल बोललेले आजही आपल्या समाजाला आवडत नाही. कथेत सरळसरळ प्रलोभन व भीती यांचा वापर करण्यात आला आहे असा आक्षेप काहींचा आहे. संत गाडगे महाराज हजारोंच्या समुदायासमोर या कथेचा पंचनामा करत.

घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको. नासिक येथील झालेल्या अलीकडील सिहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने ३० कोटी रुपये खर्च केले. जिथे पाणी, शिक्षण या गोष्टींची टंचाई दूर करता आली असती.

अंधश्रध्दांना विराध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रुढी, कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल, फसवणूक याला विरोध. श्रध्देचा फायदा घेऊन अंधश्रध्दा रुजवली जाते. लोक अंधश्रध्द बनतात ती त्यांची गरज असते. काही अंधश्रध्दा जायलाच हव्यात. समाजाला मागे नेणाऱ्या या अंधश्रध्दा संपायलाच हव्यात.

– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. 9403805153
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-13, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे 411 038.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 17 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..