नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मराठी वाड्मयातील चरित्रलेखन

गेल्या पन्नास वर्षांत समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध स्तरांवरच्या मान्यवरांची तसेच कार्यकत्यांची चरित्र लिहिली गेली. पण चरित्रकारांनी अभ्यासासाठी निवडलेले चरित्रनायक पाहता, अजूनही बरेचसे चरित्रनायक स्वांतत्र्यपूर्व काळातले असल्याचे दिसते. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात स्वकर्तृत्वाने विभिन्न क्षेत्रात कर्तृत्वाने समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तीही नव्या चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय केल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. चरित्रकारांच्याही पिढ्या बदलत गेल्याचा तो दृश्य वाङ्मयीन परिणाम होता. […]

संवाद हीच अंतर्मनाची गरज

“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. […]

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारिता

ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला. […]

सामाजिक बांधिलकीची जाणीव

सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल. […]

श्रीस्थानक : सामाजिक व सांस्कृतिक

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला ज्येष्ठ इतिहास संशोधक दाऊद दळवी यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  ठाण्यातील सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला अव्वल इंग्रजी आमदनीपासून सुरुवात झाली. इंग्रजी भाषा व पाश्चात्त्य शिक्षण यामुळे त्या काळातील तरुण सुशिक्षित वर्गात वैचारिक क्रांती आली. अंधश्रद्धा, […]

मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स ! […]

विचारांना वाट करून देण्याची गरज

मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. […]

पन्नास वर्षांची मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाचे प्रवाह

मराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे. […]

लहानपणातलं बालपण

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं. […]

बालमनाला सांभाळणे आवश्यक

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. […]

1 24 25 26 27 28 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..