नवीन लेखन...

लहानपणातलं बालपण

 

लहानपणातलं बालपण हरवत चालल्याचं पदोपदी जाणवतं. एकूणच बदलत चाललेली जीवनशैली, जीवनमान, गरजा आणि अपेक्षा ह्या सर्वच बाबींचा समाजमनावर आणि विशेषतः बालमनावर होत असलेला विपरीत परिणाम दुर्लक्षित करून चालणार नाही, हे आपल्या प्रत्येकानं स्मरणात घेतलं पाहिजे. दिवसेंदिवस निर्माण होत जात असलेल्या आपापसातील दुराव्यामुळे रक्ताच्या नात्यातील ओलावा राहण्याची शक्यता कमी होत चाललेली असल्याचं जाणवत आहे. एक काळ असा होता,  जेव्हा नव्यानं नाती निर्माण केली जायची. काही वेळा तर ती रक्तापलीकडची असून सुद्धा अधिक घट्ट असायची. अलीकडील काही दिवसांत अगदी मोजक्याच नात्याचं कुटुंब आपल्याच भावविश्वात रममाण झालेलं दिसून येतं. अर्थात याला बदलत चाललेली जीवनशैली, मानसिकता कि व्हर्च्युअल जगाची उत्पत्ती कारणीभूत आहे, हा कळीचा मुद्दा आहे.

आपण केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून बालमनावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्यानं अभ्यासपूर्वक विचार करायला हवा. बालसंगोपनात अनकेदा काळजी केवळ संबंधित बाळाच्या शरीराचीच घेतली जाते. खरं तर विचार बाळाच्या बालमनाचा प्राधान्यानं आणि प्रकर्षानं केला गेला पाहिजे.

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

 

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..