नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

सत्याची कास अपेक्षित

गेली २२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन व अंगणवाडी सेविका, कामगार प्रश्न, वनविभाग, अन्न-औषध प्रशासन, महिला आर्थिक विकास ह्या विषयांवर विश्लेषणात्मक लेखन. […]

रम्य ते बालपण : मोहन वर्दे

आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल. […]

स्वदेशी आत्मनिर्भरता

लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो. […]

मी का लिहितो?

मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. […]

रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. […]

ट्रेक ऑन

ऋतू फूड्स आणि Trendy Bytes Ladoowala हे व्यवसाय सांभाळून गेली २८ वर्षे सह्याद्रीमध्ये भ्रमंती, २०० हून अधिक गडकिल्ल्यांवर भ्रमंती, ‘शिवकाव्य’ हे शिवचरित्र प्रकाशित. […]

आत्मनिर्भर भारत : व्याप्ती आणि दूरदृष्टी

आत्मनिर्भर म्हणजे जगापासून अलिप्त नाही, ‘आयात नाही’ असे नाही, ‘जगाशी व्यापार संबंध तोडणे’ असा नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असे धोरण ठरविणे होय. आपले SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) ध्यानी घेऊन, यांचा अभ्यास करून आमच्या विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आणि आमच्या संसाधनांचा विचार करून ठरविलेले धोरण म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ होय. […]

इतिहासातील भविष्यवाटा

लेखिका इतिहासाच्या शिक्षिका असून शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासक, गडदुर्गांच्या मार्गदर्शक आणि व्याख्यात्या आहेत. […]

लहानपणाचा ठेवा

गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली. […]

पहाटक्षणांची मातब्बरी !

पहाटक्षणांमधील सुंदरता, भुरळ, जादू, उत्साहवर्धक जोम आणि प्रेरणा लोळण्यात/पेंगण्यात/आळसात वाया मी घालवू नये. उलट मला माझ्या उरलेल्या आयुष्यात हे पहाटेचे ” अधिकचे ” जीवन सामावून घेऊ देत. […]

1 26 27 28 29 30 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..