नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे

कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली. […]

मिडिया इंडस्ट्रीची हाक

मुंबईच्या केसी कॉलेजमधून B.A.FTNMP पदवीधर. संगीत, वाचन, फोटोग्राफी, पर्यटन ह्यांची आवड. वयाच्या अठराव्या वर्षापासून झी, सोनी, कलर्स, अशा विविध चॅनल्सबरोबर प्रॉडक्शन युनिटमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले. […]

लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी

बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. […]

कोण स्वदेशी कोण परदेशी

पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.  यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला. […]

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले. […]

मराठी उद्योजक आणि अस्मिता

आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि ‘कोविड-१९’च्या निराशाजनक वातावरणात देशभरात एक आगळेच चैतन्य सळसळले. ही आत्मनिर्भरतेची संकल्पना सामान्य माणसाने, उद्योग जगताने आणि देशभक्त नागरिकांनी उचलून धरली. या संकल्पनेचा भावनात्मक विचार दूर ठेवून आपण मात्र वास्तवात डोकवायला हवे. […]

आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो. […]

अजाणतेपणातील वांडपणा

माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का? […]

नदीबाई माय माझी..

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. […]

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन. […]

1 27 28 29 30 31 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..