नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कायदा आणि फायदा

कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’ […]

कर्मफल

निष्कर्ष एकच.….ईश्वराच्या राज्यात देर जरी असला तरी अंधार नाहीच नाही.अन्याय तर नाहीच नाही! सर्वांनाच योग्य वेळी आपल्या “पापपुण्य कर्माचा” हिशेब चुकता करावाच लागतो! […]

व्हाय वुई  किल्ड गांधी

प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात. […]

सात्विक सुखानंद

साहित्य ,कला , संस्कृती अनादीकालापासून अस्तित्वात असून त्यामधून जीवन मूल्यांची अभिव्यक्ती जाणीव होत असते. त्यामुळे या सर्व कला सदैव अस्तित्वात असणारच आहेत. त्यातून स्वानंद मिळत रहाणार आहे! […]

यश – पचवायचं? की त्यात हरवायचं?

यशस्वी होणं , कीर्तीच्या शिखरांवर जाणं, लक्ष्मी -सरस्वती घरात पाणी भारतात हे सत्यसृष्टीत येणं हे जगरहाटीनुसार काही यशाचे मापदंड आहेत. अगदी सगळे यालाच यशस्वी होणं म्हणतात असं नाही. प्रत्येकाच्या यशस्वी होण्याच्या व्याख्या आणि लक्ष्य वेगळी असतात. बाबा आमटेंच्या मनातलं आनंदवन अपार कष्टानंतर जेव्हा प्रत्यक्षात आलं असेल त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या ध्येयामध्ये आपण यशस्वी झालो हीच भावना […]

पावा वाजवी कान्हा जेव्हा (सुमंत उवाच – १२७)

कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर. […]

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. […]

उजडा फकीर अल्ला जाने (सुमंत उवाच – १२४)

हा व्यक्ती दिसतो तसा नाहीये, त्याच्या कपड्यांवर जाऊ नका, अमुक अमुक ठिकाणी 2 फ्लॅट आहेत याचे, अमुक हिल स्टेशन ला रिसॉर्ट आहे याचं. किंवा याच्या दिसण्यावर जाऊ नका, फिरतो गाडीतून पण देणी इतकी आहेत की कधीही लोकं येऊन मारू शकतात. […]

1 29 30 31 32 33 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..