सर्वच दैनिक,’सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक’ असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,’गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते. ‘आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव नेता ‘ असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. ‘पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी’ अशा हजारों कंपन्या असतांना निर्धास्तपणे लिहिले जाते. तसेच ‘थंड रस मिळण्याचे एकमेव […]
मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात. […]
आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल. […]
….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]
कोणतीही कविता निर्माण व्हायला मराठीत (किंवा इतर कुठल्या भाषेत) कोणते शब्द अस्तित्वात आहेत हा दैवाचा भाग अटळपणे नेहमी प्रकर्षाने असतो. मुख्यत्वे संस्कृत आणि फारसी/अरबी/उर्दू शब्द जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे अवतरून सध्याच्या मराठी भाषेतले शब्दभांडार तयार झाले आहे. केवळ एक उदाहरण म्हणून मी ग. दि.माडगूळकरांचे खालचे सुंदर गीत उद्धृत करत आहे. […]
खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे. […]
हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल. […]
सोशल मीडियावर रेंगाळत असताना दोन व्हिडीओ पाहण्यात आले . दोन छायाचित्रे पाहण्यात आली . आता यात अतर्क्य काय असं कुणालाही वाटेल . रोज शेकडो व्हिडीओ आणि हजारो छायाचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ असतात . त्यापैकी हे व्हिडीओ , छायाचित्रे असतील असं वाटत असेल तर ते तसं नाही . […]
“नवरा-बायको” — पती-पत्नी — आपापसात किंवा लोकांदेखत एकमेकांना एकेरी संबोधत असले तरीही इतरांशी बोलत असताना आपल्या जोडीदाराचा उल्लेख आदरार्थी केरण्याची प्रथा मराठीभाषिक समाजात असती तर ते सुसंस्कृततेच्या दृष्टीने चांगले भासले असते. […]