नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ३

किती अथांग आणि भव्य दृश्य होतं ते! ही अथांगता आणि भव्यता निसर्गच आपल्याला शिकवत असतो. पण एका चहासाठी आडून स्वतःचा खुजेपणा जास्तच जाणवतो. गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मन अधीर झाले. […]

श्री गुरुदेव रानडे प्रणित श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र

श्रीगुरुदेव रानडे यांनी रामदास वचनामृत’ हा ग्रंथ संपादित/ संग्रहित करून त्यातील निवडक ओवीवेचे काढून त्यावर सूत्रभाष्य वजा शीर्षक देऊन, तसेच त्यास विवेचक प्रस्तावना लिहून निंबरगी संप्रदायाचा आध्यात्मिक दृष्टीकोनही उलगडून दाखविला आहे. त्यामुळे ‘श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र’ कळून यायला मदत होते. दासबोधातील एक अध्यात्मानिरूपणाचा ओवीबंध विशद करून दाखविला. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग २

कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं. […]

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले. […]

अधिष्ठाता विठ्ठल

आषाढीचा मुहूर्त गाठत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर पडत आहेत. भक्तांच्या गर्दीत त्यांना विठोबाचं दर्शन होणार नाही, कदाचित…पण त्यांना लांबून दिसणारा विठ्ठलमंदिराचा कळसही पुरतो दर्शनासाठी…कारण त्यांचा विठ्ठल, त्यांच्या हृदयातच तर वसतो! […]

प्राण आणि श्वास

सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते. […]

श्रीमद्भगवद्गीता – अध्याय दुसरा – सांख्ययोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय  सञ्जय उवाच । तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः  ॥१॥                 अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन     १ श्रीभगवानुवाच । कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन       […]

जाऊ तेथे वारी

सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे…  […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १

माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला. […]

विज्ञानयुगातील अध्यात्म-वेदान्त

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी या सत्तेतच काम करतात. नियमबद्धतेमुळे व्यावहारिक जगतात नवीन निर्मिती शक्य होते वस्तुस्थिती हे व्यावहारिक सत्तेचे मुख्य लक्षण आहे. भौतिक वास्तवात आज आहे त्यावरून पुढे काय होईल ते आपण सांगू शकतो व जे इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो. भौतिकीचे सर्व नियम व संशोधन हे या व्यावहारिक स्तरावरच घडत असते. अगदी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांतदेखील वास्तविक काय आहे ते सांगतो. […]

1 19 20 21 22 23 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..