श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे. सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात. पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. […]
श्रावण मासातील शुक्लपक्षातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. कलशावर वरदलक्ष्मी स्थापन करून श्रीसूक्ताने देवीची पूजा करतात. २१ अनरश्यांचा नैवेद्य अर्पण करतात. या व्रताचे फळ व्याधीनाश असे आहे. दक्षिण भारतातदेखील हे व्रत आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील अखेरच्या शुक्रवारी करण्याची रीत आहे. -श्री करंदीकर गुरुजी
श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे. -श्री करंदीकर गुरुजी
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात. -श्री करंदीकर गुरुजी
श्रावण महिन्यांत पौर्णिमेचे दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने राजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे. इतिहास कालापासून याची नूतन प्रथा सुरु झाली. या काळात बहीण भावाला राखी बांधू […]
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे. […]
श्रावण शुद्ध सप्तमीला सीतला सप्तमी हे व्रत केले जाते. कलशावर सीतला देवीची स्थापना करून पूजन करतात. बाकी सर्व विधी इतर व्रतांप्रमाणे आहे. -श्री करंदीकर गुरुजी
नरसोबावाडी ही साधु-संतांची तपोभूमि आहे. श्रीराम चंद्रयोगी तेथे राहिले होते. नंतर नारायणस्वामी आले. काशीकर स्वामी, गोपाळस्वामी तेथेच राहिले. येथे प्रसिद्ध मौनीस्वामी सिद्धपुरुष होऊन गेले. ब्रह्मानंद स्वामी, गोविंदस्वामी येथे रहात असत प.पू. श्रीटेंबेमहाराज येथे वरचेवर येत होते. योगी वामनराव गुळवणी महाराज दर गुरुद्वादशी वारी करीत असत. […]
भगवान विष्णूंचा दहावा अवतार. काहींचे मते तो होऊन गेला तर पुराणांच्या मते तो होणार आहे. कल्की पुराणात कलीयुगाचे शेवटी हा अवतार होईल असे सांगितले आहे. […]
श्रावण शुद्ध षष्ठी रोजी हे व्रत केले जाते. या व्रताचा कालावधी ५ वर्षे आहे. भगवान शिवांची मंदिरात घरी पूजा करावी. वरण भाताचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यात खारवलेल्या आंब्याचा समावेश असावा. उद्यापनाचे वेळी आंब्याच्या पानांच्या आहुती देतात. या दिवसाला सूपोदन वर्णषष्ठी असेही म्हणतात -श्री करंदीकर गुरुजी