नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग १

भाविकांच्या मते, भगवान शंकराचे माहात्म्य व साधेपणा सांगणारे, शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. त्याच्या कालासंदर्भत विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत. […]

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे. ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन […]

अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]

सदगुरु श्री स्वामी स्वरूपानंद

घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती. […]

एका महासिद्धाचे जीवनदर्शन

स्वामी स्वरूपानंद आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानी मनूष्य ब्रह्मज्ञानाच्या तेजोवलयात वास करीत असतो. तसे स्वामी होत. म्हणून जनात असूनही ते जनावेगळे होते. हाडामांसाचा देह त्यांनी धारण केला होता. तथापि त्याच्या बंधनात ते वावरले नाहीत. किंबहुना हाडामांसाचा देह ज्या पंचतत्त्वांपासून निर्माण होतो त्या पंचतत्त्वाशी त्यांनी एकरूपता साधलेली होती. त्यामुळे ते श्रीमंतीचे वैभवही भोगत होते आणि दीन दरिद्री दुःखी, दुबळ्यांची आर्तताही आत्मीयतेने जाणत होते. एक विराट विलक्षण तथा सहज, सामान्य या सगळ्यांची राखण करून प्रेमाने ओतप्रोत भरलेले जीवन ते जगत होते. […]

दत्ता दिगंबरा

दत्तप्रभूंची विविध रूपे अवतार पाहायला मिळतात. आजही कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्याला भेटतात .आपल्या मनीषा पूर्ण करतात. योग्य मार्ग दाखवतात पण हे रूप ओळखण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी साधनेची, निष्ठेची, भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितांत श्रद्धेची व सबुरीची गरज आहे. […]

बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची. […]

प. पू. आईंचे भजन-चिंतन

प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत […]

दामोदर अष्टकम – मराठी अर्थासह

दामोदराष्टक स्त्तोत्र, कृष्ण द्वैपायन व्यासांनी रचलेल्या पद्म पुराणात सत्यव्रत ऋषी व शौनक ऋषी यांच्या संवाद रूपात आहे. श्रीकृष्णाचे अत्यंत रसाळ चरित्र श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात येते. त्याच्या बालपणीच्या अनेक कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यातीलच अध्याय ९ व १० मधील एक कथा – श्रीकृष्णाच्या खोड्यांना आवर घालण्यासाठी यशोदेने त्याच्या कमरेला दोर बांधून दुसरे टोक उखळाला बांधले. बालकृष्णाने उखळासकट […]

मन मंदिर

घरात ही पूजा अर्चना रोज करतो पण मंदिराचे ते रम्य वातावरण घरात जाणवत नाही. ती ऊर्जा, शांती-सुखाचे प्रकंपन आपल्याला आपल्या घरात मिळत नाहीत. सध्याची परिस्थिती बघता ते वातावरण घरात निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते आपण करू शकतो. […]

1 15 16 17 18 19 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..