नवीन लेखन...

गोकुळ म्हणजे काय?

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.

गोकुळातील श्रीकृष्ण यात फार खोल अर्थ आहे. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिये. गायीं ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून वाटेल तेथे चरत जातात, त्याप्रमाणे ही इंद्रिये ते ते विषय पाहून त्यांच्या पाठीमागे स्वैर पळत सुटतात. आपले जीवन म्हणजेच गोकुळ. कुळ म्हणजे समुदाय. इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ. असे गोकुळ आपल्या प्रत्येकाजवळ आहे.

परंतु या गोकुळात आनंद नसतो, या गोकुळात सुखसमाधान नसते. येथे संगीत नसते, मधुर मुरली नसते. येथे व्यवस्था नाही. नृत्य-गीत नाही. या जीवन- गोकुळात सारे बेसूर काम चाललेले असते. इंद्रियांच्या शेकडो ओढी असतात. हे इंद्रिय खेचते, ते इंद्रिय खेचते. मनाच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्या प्रवृत्तीत एकवाक्यता नसते.

अंतःकरणात सारा गोंधळ. सारी आदळ-आपट. या गोकुळात वणवे पेटलेले असतात. अधासुर, बकासुर (बकासुर म्हणजे दंभासुर) या गोकुळात येऊ पाहात असतात. आपल्याला आपल्या हृदयात सारखा गदारोळ व धांगडधिंगा ऐकू येत असतो. रात्रंदिवस हृदयमंथन सुरू असते. आपण समुद्रमंथनाची गोष्ट वाचतो. समुद्रमंथन म्हणजे हृदयसमुद्राचे मंथन. या हृदयसागरावर अनेक वासना-विकारांच्या लाटा प्रत्येक क्षणाला उसळत असतात. अमृतप्राप्ती होईपर्यंत खरे समाधान, खरी शांती यांचा लाभ होईपर्यंत- हे असे हृदयमंथन सुरूच राहणार.

आपल्या या हृदयातील अशांतीने आपली तगमग होते. द्वेष-मत्सरांनी मस्त झालेल्या अशा जीवन-गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो. वसुदेव-देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, नंद-यशोदेने त्याचा प्रेमाने प्रतिपाळ केला. नंद म्हणजे आनंद. यशोदा म्हणजे यश देणाऱ्या सद्वृत्ती. आनंदासाठी तडफडणारा हा जो जीवात्मा आणि या जीवात्म्याला साहाय्य करणाऱ्या ज्या सत्त्ववृत्ती यांच्या तळमळीतून हा श्रीकृष्ण जन्माला येतो. हृदयातील मोक्षाची तळमळ म्हणजेच कृष्णजन्म. कृष्णजन्म व रामजन्म केव्हा झाला ते आपण जर पाहू लागलो, तर त्यात केवढा अर्थ आपणास दिसेल.

– साने गुरुजी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..