हरितालिका तृतीया
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. […]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. […]
श्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते. […]
विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे. […]
संख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल. गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात. […]
आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे. […]
हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात […]
पेण मधला गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आता चांगला प्रतिष्ठा पावलाय. गणपतीची उत्तम मूर्ती कुठली तर पेणचीच अशी पेणची ख्याती झाली आहे. भारताच्या नकाशावरील बारीक टिंबाएवढं पेण गाव आषाढ महिना संपून श्रावण उजाडला की एकदम प्रकाशझोतात येतं. […]
रत्नागिरी शहरातील आंबराई वरची आळी या भागात १८ हात असलेल्या गणपतीचे मंदिर असून महाराष्ट्रातीलच नव्हे जगात पहिलेच गणेश मंदिर आहे. १८ हात असलेली श्री गणेशमूर्ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. हे गणेशाचे मंदिर कै. विनायक कृष्ण जोशी यांनी स्वतःचे मालकीचे ठिकाणात स्वखर्चाने बांधले आहे. […]
कृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. […]
श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी. सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions