अध्यात्मिक / धार्मिक
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
तुलसी विवाह
कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात. […]
अनंत चतुर्दशी
हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही. […]
वामन जयंती
विष्णूंच्या दश अवतारातील पाचवा अवतार वामन. हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी श्रवण नक्षत्रावर झाला. म्हणून या दिवशी वामन जयंती साजरी करतात. या तिथीला काही भागात वामन द्वादशी असेही म्हणतात. […]
अदुःख नवमी
भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. […]
आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व
आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. […]
श्रीगणेश चतुर्थी
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
[…]
