महिला दिन (दीन?)
अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज | मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा | मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत | घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला […]
