नवीन लेखन...

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर […]

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला,  थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फूटतां,  हाती येईल काय ते ? उंच हा गिरीराज देखूनी,  शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी,  चढणे सोपे काय ते ? अथांग सागर खोल जरी ,  डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता,  सूर मारणें जमेल कां ते? काव्य सरिता वाहात आहे,  ज्ञान गंगोत्री […]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा  । उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा  ।। गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे  । पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे  ।। पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला  । नाहून जाता त्यात,  देह भान विसरला  ।। सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे  । आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे  […]

कोण हा कलाकार ?

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई […]

जीवन प्रभूमय

जीवन काय आहे    मला जे वाटत असे ते समजून घ्या तुम्हीं    प्रभूमय ते कसे ….१ मृत्यूचा तो विचार    कधी न येई मनी मृत्यू आहे निश्चित    माहीत हे असूनी…२ भीती आम्हां देहाची    कारण ते नाशवंत न वाटे मरूत आम्ही    आत्मा असूनी भगवंत….३ आत्मा आहेची अमर     मरणाची नसे भीती जी भीती वाटते    ती देहाची असती….४ आत्मा नसे कुणी […]

सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।।   रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।।   रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।।   हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।।   सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।। […]

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं […]

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे  । कष्ट सोसले शरिर मनानें,  चिज तयाचे झाले दिसे…..१ बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने  । यश ना पडले पदरी.  केव्हा मान फिरविता नशीबाने….२ निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती  । शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३ लिहीता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता  […]

वडिलांचा आशिर्वाद

  नव्हतो कधींही कवि वा लेखक     कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी     काव्य मजला सूचू लागले    १ वाङ्‍मयाविषयी प्रेम होते     वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले     पुस्तके वाचूनी सगळी   २ खो – खो मधल्या खेळा सारिखे     खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज     ते गेले चटकन निघूनी   ३ गोंधळून गेलो […]

1 281 282 283 284 285 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..