अमेरिकेतील नवागत-नातवास
नवागता, बाळा, तुज बघुनी आनंदानें भरली कावड मरुस्थला भिजवी श्रावणझड . – नवागता, नवकिरण भास्कराचा शुभंकरा, तूं कळस मंदिराचा आशीष तिथें देई प्रशांत-उदधी देइ इकडुनी आशीर्वच हिमनिधी . – प्रशांत–उदधी : Pacific Ocean हिमनिधी – हिमालय – बाळा, ‘उद्या’ची आशा तूं ही समजशील कां भाषा तूं ? एकच भाषा येते तुज – ‘रुदन’ त्यानें प्रमुदित ‘काल’-‘उद्या’चे […]
