शेर प्रीतीचे
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“ पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा . मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा . तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी . […]
