नवीन लेखन...

मक्षिकेचे आत्मसमर्पण

उडत उडत एक मक्षिका,  देव घरांत ती शिरली, पुजा साहित्य आणि मूर्तिवरी स्वच्छंदानें नाचूं लागली…१,   धुंदीमध्ये बागडत होती,   मूर्तीच्या ती बसे शिरावरी धूप, गंध आणि सुमनावरूनी,  जाई मध्येच प्रभू चरणावरी…२,   पंख चिमुकले हलवीत ती,  मूर्तीपुढें गांवू लागली प्रसाद दिसतां पंचामृताचा,  प्रभू अर्पिण्यासी झेपावली…३, नैवेद्याच्या क्षीर सागरीं,  आत्मसमर्पण तिने केले प्रभू सेवेत तल्लीन होवूनी,  जन्माचे […]

प्रेम झरा

प्रेम झरा नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।।   वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।   कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।   कुणीतरी […]

आईचे ऋण

आईचे ऋण मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला      तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या […]

सर्व जीवांना जगू द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

निसर्गाचा चमत्कार

सोळा वर्षांचा ज्ञानोबा    महाकवी झाला गीतेंवरी टिपणी लिहून    मुकुटमनी ठरला गजाननाचा आशिर्वाद    लाभला त्याला ज्ञानेश्वरीचा प्रवाह    हातून वाहूं लागला अष्टावक्र दिसे विचित्र    परि महागीता रचिलि अकरा वर्षाच्या मुलानें    मान उंचावली विटी दांडू खेळत असतां    काव्य करुं लागला शारदा होती जिव्हेवरती    ज्ञान सांगू लागला निसर्गाची रीत न्यारी    चमत्कार तो करितो भव्य दिव्यता दाखवूनी    आस्तित्व त्याचे भासवितो डॉ. […]

देहातील शक्ती

नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फूरीनी जाती,  देहामधूनी विज चमकती धनको ऋणको विद्युत साठे, […]

हर घडी मिळो सहवास

मानव देह देवूनी ईश्वरा,  उपकार केले मजवरती सेवा करण्या तव चरणाची,  संधी लाभली भाग्याने ती…१, कर्म दिले तू मानव योनीसी,  श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे उद्धरून हे जीवन नेण्या,  कामी येतील प्रयत्न सगळे…२, मुक्त होणे जन्म मरणातूनी,   साध्य होई ते प्रभूसेवेने परि तीच मुक्ती वंचित करते,  आनंदमयी प्रभू दर्शने…३, एक मागणे प्रभू चरणी,   मुक्ती न देयी तू […]

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।। आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।। शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।३।। कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर   देई बांधून सर्वा घर […]

(बालदिनानिमित्त) : जराशी मजा

उंदीरमामा दिसताच मनीमाऊनं घातली झडप उंदीरमामा झटकन् बिळात झाला गडप. कुत्रा गुरगुरला बोक्यावर बोका त्याला फिसकारला दोघांनी नाकं फेंदारली दोघांची गुरगुर वाढली दोघांची शेपटी झाली ताठ कुत्र्यानं वासले दात अन् पाय उगारला बोक्यानं नख्यांचा पंजाच मारला. गाईचं वासरू गोठ्यात रुळतंय् आईचं वासरू मांडीवर खेळतंय् गाय वासराला चाटतेय् प्रेमानं, हळू हळू आई बाळाला थोपटतेय् प्रेमानं, हळू हळू […]

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे? निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें डॉ. भगवान […]

1 282 283 284 285 286 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..