ऑफिसातले माणिकमोती -२
तमाम पब्लिक धावतं उगवत्या सूर्याला नमन करायला. शेठच्या मुलानं बोलावतांच, सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला. – तोंड घट्ट मिटून किती गूढ गुपितं आंत दडवून ठेवतं ऑफिसचं भलंमोठं सेफ. – प्रवास बोरीवली ते फोर्ट डोंबिवली ते कोर्ट. लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं. – सुभाष स. नाईक