नवीन लेखन...

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।। आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।। आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।। आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते  […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  बांधून गेल्या घरटे  । खेळूनी नाचूनी,  चिव चिव गाणे गात वाटे  ।। झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवी हलके हलके  । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके  ।। संसार चक्र  भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी  । नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी  ।। पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे […]

मन तुझे कां गहिवरले ?

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ? शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ? देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ? सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले […]

वाह्यात रुबाईयात

ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ? फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’ ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें – ‘चालेल मज […]

शेर प्रीतीचे

बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“ पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा . मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा . तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी . […]

मद्यपान की मद्यगान ?

जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही  ।। ”होळीचा सण  अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” ; ”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ? ‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती”  ।। सर्वांपुढे निजदु:खा […]

पर्यावरणीय हायकू

आला मान्सून, मान्सून आला सज्ज-सज्ज स्वागताला तुंबलेला नालान् नाला. कचरा-डोंगर गटार-सागर अशक्य उल्लंघन हनुमंताही. रामानें शिवधनू भंगलें. पण, त्याआधीं प्रदूषणानें अर्धवट होतें खाल्लें. त्रिशंकू आहे आजचा माणूस. प्रदूषणाला स्वीकारत नाहीं अन् मारतही नाहीं. विश्वामित्राची प्रतिसृष्टी कुठे आहे, शोधूंया चला. पण सावध! तिथेंही प्रदूषण असेल! व्यास रचणार कसें हें महाभारत ? गणपती लिहिणार कसा ? हा प्रदूषण-विजय […]

शीळ वाजवीतो

शीळ वाजवीतो वेळूमध्ये वारा जसा मुलींना बघून कुणी टारगट पोरगा . – रानोमाळ धावतांना वेग अफाट वार्‍याचा नांव प्रेयसीचें घेतां जसा हृदयाच्या ठोक्यांचा . – नेतो त्याच्यासंगें वारा ढगांना ओढून जशी युवती सुंदर खेची तरुणांचे मन . – खेळतसे लपंडाव सूर्य मेघांबरोबर दिसे, वात्रट कोणी मारी डोळा, पोरीच्या समोर . – क्षितिजावर नभांत जाई भूमी मिसळून […]

मुंबईतील मराठी माणसांची व्यथा

मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते – ‘टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात ? अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच….. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ? तुम्ही डॉलर मिळवा लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत तुम्ही स्वदेशी […]

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’  ।। ‘मद्य मद्य’ करुं या  हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे ।। जरि असलो आम्ही […]

1 278 279 280 281 282 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..