नवीन लेखन...

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

नशा

“नशा” नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली ! मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने ! दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले ! कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष […]

मतदार

झालो मी अठरा वर्षांचा म्हणुन मिळे अधिकार नामी. मत देण्याचा. या दिवशी मी आहे राजा ताजा ताजा. उलथिन मी नेत्यांची तख्तें बदलिन मी नावांचे तक्ते. – तख़्त  – सिहासन — सुभाष स. नाईक

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली  ।। शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणाणू बंध,  बांधले होते हृदयानी  ।। उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।। मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी  […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा स्थिर राहूनी लपतां […]

सखू ग सखू

सखू ग सखू, कुठं चाललीस? बाजारात जाते, बाजारहाट करते भाजीपाला आणते,फळबिळं आणते अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते सखू ग सखू, कुठं चाललीस? पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते गंध पावडर आणते,फणीबिनी बघते साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते सखू ग सखू, कुठं चाललीस ? दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते दवापाणी घेते, डिकमली बघते गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते सखू ग सखू, कुठं […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।।   झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला […]

1 … 276 277 278 279 280 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..