नवीन लेखन...

गृहित

रात्र येत राहते दिवस येत राहतो आपण गृहितच त्यांना धरत राहतो असेच महिने येत राहतात असेच वर्ष जात राहतात आपण गृहितच त्याना धरत राहतो केस पांढरे अंगावर सुरकुत्या पाठीत बाक लटपटणं वगैरे होत राहते मग आपल्याला गृहित धरत राहतात ते रात्र दिवस माहे साल काळाचे घटक येत जात राहतात ……आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी […]

देशभक्तीची लाट

देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं कुणी जवान शहीद तर झाला नाही ना! अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना? जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना? (कुरकुरतं …. शरीर नाही पेलवत पेग पुढचा एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?) मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।।१।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।।२।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।३।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   ईच्छा उरली […]

धोकादायक

महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर 

आणखी का …… रे?

नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ? साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ? माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ? राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ? केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे […]

इतनी मुद्दत बाद मिले हो

मुळ गझल “मोहसीन नक्वी” यांची आणि “गुलाम अली” यांनी गायलेली सुंदर रचना . मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ?   इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो ( किती दिवसानंतर भेटते तू गं कोणत्या विचारात डुबते तू गं) तेज़ हवा ने मुझसे पूछा, रेत पे क्या लिखते […]

निरागस जीवन

प्रफुल्लित ते भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या तो आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या त्या दिवसा […]

फेब्रुवारी

फेब्रुवारीला एवढी का बरं घाई दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई ! ****** आली का सुचना,आदेश कुठून आताशा फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा ! — श्रीकांत पेटकर 

आकाश

इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना गरीबांच्या घरीच तेवढं छपरातून का डोकावून पाहावं आकाशानं ? — श्रीकांत पेटकर 

1 231 232 233 234 235 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..