असावा सुंदर पापलेटचा बंगला

असावा सुन्दर पापलेटचा बंगला चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार   दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार बांगड्यांना अंगभर खवले फार फार   बंगल्याच्या छतात कालवा रहातो शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो लांब लांब करल्यांचा नाच रंगला बोंबिलाचा मासा मस्त चांगला   किती किती […]

पानिपत

आपापल्या महालात तुम्ही सर्वेसर्वा असता, मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे सरदार असा किंवा शिलेदार. बाहेर पडल्यावर मात्र तुम्ही बनता जगातील कुणीतरी, लहानमोठे. कुणापुढे तरी तुम्हाला झुकावं लागतं . पण , आणखी कुणाला तरी तुम्ही स्वत:पुढे वाकायला लावता . आणि त्यामुळे , फक्त त्यामुळेच , तुम्ही मोठे मोठे बनत जाता – डोंगराएवढे पर्वताएवढे . पण , […]

लाडक्या नातीस

जन्मापासूनी बघतो तुला, परि जन्मापूर्वीच ओळखले, रोप लावले बागेमध्ये, फुल तयाने दिले ।।१।। चमकत होती नभांत तेंव्हा, एक चांदणी म्हणूनी, दिवसाही मिळावा सहवास, हीच आशा मनी ।।२।। तीच चमकती गोरी कांती, तसेच लुकलुकणे, मध्येच बघते मिश्कीलतेने, हासणे रडणे आणि फुलणे ।।३।। चांदणीचा सहवास होता, केवळ रात्रीसाठी, दिवस उजाडतां निघून गेली, आठवणी ठेवून पाठी ।।४।। नको जाऊस […]

नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१, कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील भीजव त्यांचे सारे अंग…३ (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल) — डॉ. भगवान नागापूरकर

स्वयंचे विस्मरण

बाह्य जगीं प्रभूसी शोधतो, विसरे जेव्हा ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ कांही काळची विस्मृती ही, ईश्वर चिंतनाच्या येई कामी…१, शरिर जेव्हां रोगी बनते, सुदृढतेची येई आठवण प्रकाशाचे महत्त्व वाटते, बघूनी अंध:कार भयाण…२, चालना देयी विस्मरण ते, शोध घेण्या त्याच शक्तीचे उकलन होते मग प्रभूची, स्मरण होता अंतर्यामीचे…३ – डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भोक

तुझ्या भिंतीवर मारला खिळा आणि पडला भोक तिला… त्या भोकातून पाहिले तुला पण दिसला चंद्र मला… त्या भोकाला लावला डोळा तेंव्हा दिसला काळोख मला… त्या भोकातूनच मग भिडला तुझ्या डोळ्याला माझा डोळा… त्या भोकातून पाहिले तुला तुही मग पाहिले मला… त्या भोकावर टांगले मला तुही मग टांगलेस तुला… त्या भोकातून दिले तुला तुही दिले प्रेम मला… […]

थोबडा

तुझा थोबडा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोच नाही तुला पाहून माझ्या हृद्याचे ठोके चुकले पहिल्यांदाच… मला वाटते तुझे आणि माझे काही नाते असावे गतजन्मीचे पण ते नाते प्रेमाचे नाही तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच कारण क्षणात माणसांना भुरळ घालणार्‍या मला तुझ्या मागे उगाचच धावत राहावे लागलेच नसते वर्षानुवर्षे वेड्यागत… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)

निरोप

तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला  । दूरवर बघत राहीन, ती लेकीला  ।।१।। लेक चालली निरोप घेवूनी, सासरी  । भरल्या नयनी माय उभी, शांत दारी  ।।२।। जड पावले पडता दिसती, लेकीची  । ओढ लागली त्याच पावलांना, मायेची  ।।३।। उंचावूनी हात हालवीत, चाले  लेक  । जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक  ।।४।। वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली  । अश्रूपूसून पदराने, […]

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ// **   शेजारचा छेड छाड करतो पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली पोलिसानेच बलात्कार केला म्हणून रडत घरीं आली रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मागायचं   //१// मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? **    बापाने दिलेल्या फ्लॅटवर घर […]

1 230 231 232 233 234 305
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..