About श्रीकांत पेटकर
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

नजरेचा बलात्कार

कुठुन कुठुन नजरा जातात शिरत राहतात अंग बघायला बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात पाठीवर हातावर कधी छातीवरही काही झरोके ब्लाॅउज अन साडीच्या मधला भागही शोधत राहते अन मोठाच बलात्कार करत असते नजर एकही अंग उघडं नसलेल्या अंगभर कपडे घातलेल्या बाईवर ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा  काठ ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन…. तेव्हा ! — श्रीकांत पेटकर 

हायकु

एक.. वाळली  पाते वावटळीशी नाते बोडके  झाड…. दोन लाट येणार नक्की  विचारणार घर  कोणाचे ? तिन उदास पाने भरकटत  वारा आनन्दी  गाणे….. — श्रीकांत पेटकर

मी महिलादिन साजरा केला

सकाळी रोजच्या प्रमाणे अाँफीसची तयारी केली पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे मी  ओफिसला ती घरी मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे मी घरी आलो तिने पाणी दिलं चहा केला रोजप्रमाणे महिलादिनानिमीत्त सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं ……….नंतरच ती गेली कार्यक्रमाला मी तिला शुभेच्छा दिल्या रोजसारखीच आजही […]

पुन्हा नव्याने 

सगळंच विसरुन मागचं जगेन  म्हणतो नव्याने मलाच मी ओळखेन पुन्हा मी नव्याने — श्रीकांत पेटकर कौशल 

पायांचे बिल

मी  थोडा  चाललो तर  पायानी  बिल  दिले  लगेच फुटाप्रमाणे  दर  लावून आता मी  हाताला आधीच  विचारतो कविता  लिहु  का  म्हणून ? — श्रीकांत पेटकर कौशल 

मुलीच्या कविता

बालपणात एकत्र खेळतात सगळे मुलंमुली वय वाढत जाते भवतालचं मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते . ‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते वेळीच एकत्र खेळणं थांबवावं …….असं वाटणं अनुभवाचं . कसं सांगावं वेगळे असतात आतून सगळे वेगळे असतात स्पर्श वेगळे असतात खेळ वेगळ्या असतात नजरा आणि मुलात माणूस अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते […]

नारायण टिनपट्या

लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो . […]

रविवार आणि नवरा… महिला दिनाबद्दल

रविवारला नवरा स्वयंपाकखोलीत घुसला चल …आजतरी तुला मदत करतोच म्हणाला मी म्हणाले ,मला आधी दिवाणखान्यात जावू द्या पेपर वाचता वाचता तुमच्यासारख्या बातम्याही बघू द्या.. अगं, तुला मदत करायला आलो तर तुच बाहेर जाते! भाजी पोळी करायला मला एकट्याला कुठे येते? रोज कसं तुम्ही आँर्डर सोडता तशा आॅर्डरी मला करु द्या कसं वाटतं मनामधी तुम्हालाही.. जरा अनुभव […]

एक दगड वाटेवरचा

एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी आणले मंदिरी, जरासा आकार देवूनी ।। हात जोडती… पाया पडती अंगावर किती थर जडती वेगळाच मी ठरतो, देव शब्दात अडकुनी । एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी।। किती खाऊ,किती फळेफुले तोंड न मजला, देतच सुटले कशासाठी कुणासाठी, मला पडे ना पचनी । एक दगड वाटेवरचा……मला उचलले कुणी।। शाळेच्या भिंती आम्ही बांधू धरणाच्या भिंतीतही आमचे […]

गावातील  आईचे मागणे 

कळावे  लोभ असावा ,पत्र  मी केले पुरे कळेल ना खरोखरी , पत्ता कुठचा लिहावा  बरे ? सगळेच गुंग मोबाइलवरी ..मेसेज आणि कॉलवर मी अडाणी  अजून चिपकून ..जुन्याच पत्र चिट्ठीवर शब्द लेकराचे जपून ठेवले ….वाचते,हात लावते पुन्हा पुन्हा घड्या  करुनी  सांभाळते ….त्यात माझा दिसे कान्हा स्पर्श अक्षरांचा  जणू लेकराला थोपटते  मी झोपतो बाळ आन स्वप्न पाहत झोपते मी केवढा होता सहारा  पत्राचा …छान वेळ वाट बघण्यातही आता तर  विसरलाच पत्ता घराचा ..गावचा  पोस्टमनही मोबाईलवर थरथर  म्हणुनी  बोलणेही होतेच कट खरे तर नातसुनांना ..वाटते माझी का कटकट खोटेपणा, फसवेगिरी ..दिसतेच या  यंत्रात मला खास वेळ काढून लिही रे  लेकरा एक पत्र  मला / — श्रीकांत पेटकर

1 2 3 4