About श्रीकांत पेटकर
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

जिद्दी एव्हरेस्टवीर – आनंद बनसोडे

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते. […]

बुझगावणं

माणसाला वाटत राहतं पाखरं त्यांना घाबरतात म्हणून पिकात बुझगावणं उभारतात अाळशी माणसाच्या सवयी त्यांना माहीत होतात बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर पाखरं मस्त खेळत राहतात. छानपैकी दोस्ती करतात…. — श्रीकांत पेटकर 

पुर्णविराम

एक वाक्य लिहिलं की पुर्णविराम देतो. दुसरं तिसरं वाक्य लिहून झालं की पुन्हा पूर्णविराम. अजून काही वाक्ये लिहत राहतो. पुर्णविराम देत देत. सगळं लिखाण संपतं पुर्णविरामानं. तरीही काही आठवलं की ताजाकलम म्हणून अजून वाढवत राहतो लिखाण. पुर्णविराम देवुन पुन्हा. या अपुर्णविरामांना दुसरं नाव शोधतोय मी. मधल्या सगळ्या पुर्णविरामाच्या टिंबाला वेगळं अन शेवटच्या खरोखरच्या पुर्णविरामाच्या चिन्हाचा आकारच […]

च्या भैन

च्या भैन .. .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती…. मी तिच्याकडं पाहो ती मायाकडे पाहत होती…….. […]

गृहित

रात्र येत राहते दिवस येत राहतो आपण गृहितच त्यांना धरत राहतो असेच महिने येत राहतात असेच वर्ष जात राहतात आपण गृहितच त्याना धरत राहतो केस पांढरे अंगावर सुरकुत्या पाठीत बाक लटपटणं वगैरे होत राहते मग आपल्याला गृहित धरत राहतात ते रात्र दिवस माहे साल काळाचे घटक येत जात राहतात ……आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी […]

देशभक्तीची लाट

देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं कुणी जवान शहीद तर झाला नाही ना! अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना? जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना? (कुरकुरतं …. शरीर नाही पेलवत पेग पुढचा एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?) मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत […]

धोकादायक

महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर 

आणखी का …… रे?

नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ? साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ? माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ? राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ? केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे […]

इतनी मुद्दत बाद मिले हो

मुळ गझल “मोहसीन नक्वी” यांची आणि “गुलाम अली” यांनी गायलेली सुंदर रचना . मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ?   इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो ( किती दिवसानंतर भेटते तू गं कोणत्या विचारात डुबते तू गं) तेज़ हवा ने मुझसे पूछा, रेत पे क्या लिखते […]

1 2 3 4