ईश्वरी गुप्तधन

होता एक गरीब बिचारा  ।
किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।।
कौलारु जुनी पडवी निवारा  ।
जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।१।।

परिस्थितीनें गेला गंजूनी  ।
आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।।
शरीर जर्जर झाले रोगांनी  ।
जगण्याची आशा उरे न मनीं  ।।२।।

अवचित घटना एके दिनीं  ।
धन सापडे जमिनीतूनी  ।।
मोहरांचा तो होता रांजण  ।
गेले सारे दारिद्य निघूनी  ।।३।।

जन्मभर ते त्याने भोगले  ।
घरांत लक्ष्मी, परी सोसले  ।।
अज्ञानातची हे घडले  ।
असून पाण्यांत तरी तहानेले  ।।४।।

शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा  ।
लपला आहे अंतर्यामीं मोठा  ।।
नसेल तेथे आनंदा तोटा  ।
मिळतील सदैव यश वाटा  ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1447 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…