नवीन लेखन...

अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी

अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. त्यांचा जन्म ५ मार्च १९३१ रोजी झाला. अॅडगुरु असलेल्या पद्मसी यांची भारतातील अव्वल दर्जाची जाहिरात एजन्सी होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांसाठी जाहिराती बनविल्या.

‘गांधी’ या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती.
‘ब्रँड फादर ऑफ इंडियन अॅडव्हर्टायजिंग’ असे त्यांना ओळखले जायचे. ‘सर्फ’, ‘लिरील गर्ल’, ‘चेरिंग ब्लॉसम शु पॉलिश’, ‘हमारा बजाज’, ‘एमआरएफ मसल मॅन’ अशा अनेक प्रसिद्ध जाहिरातींची निर्मिती त्यांनी केली.

जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच मुंबईतील अॅडव्हर्टायजिंग क्लबतर्फे ‘अॅडव्हर्टायजिंग मॅन ऑफ द सेंच्युरी’ असे गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीतर्फे २०१२ मध्ये टागोर रत्न पुरस्कार दिला होता. अलेक पदमसी यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..