भरकटलेले मार्ग….
असे का बोलले जाते कि चुकलेल्या मार्गावर भरकटण्याची भीती असते…?? पण आपण थोडा वेगळा विचार का नाही करत कि ह्याच भरकटलेल्या मार्गावर काही तरी वेगळं काहीतरी नविनही असू शकते …. !!!
असे का बोलले जाते कि चुकलेल्या मार्गावर भरकटण्याची भीती असते…?? पण आपण थोडा वेगळा विचार का नाही करत कि ह्याच भरकटलेल्या मार्गावर काही तरी वेगळं काहीतरी नविनही असू शकते …. !!!
आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?….१, सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध, कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध….२, विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी….३, मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा…४, मातेचे […]
स्मृतिदोषचि तो आम्हां शिकवी, जीवन सुसह्य बनविण्याते अटळ असूनी प्रसंग कांहीं, दुर्लक्ष करितो आम्ही त्याते…१, माझ्यातची तो ईश्वर आहे, आम्हास जाणीव याची असते शोधांत राहूनी त्याच्या, जीवन सारे फुलत राहते…२, मृत्यू घटना कुणा न चुकली, परि आठवण येई न त्याची विस्तृत योजना मनी आंखतां, काळजी नसते पूर्णत्वाची…३, विसरूनी जावूनी त्या मृत्यूला, जीवनांत तो रंग भरी प्रेम […]
ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई […]
मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला…१, काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी….२, दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा….३ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
नाही गेली अटूनी माया आजही वाहते झऱ्यासारखी उगांच कां तू खंत करशी न होशील मज पारखी ।।१।। वाहत असता फुटले फाटे जीवनातील वळणावरी जो तो घेई उचलूनी वाटा नशीबी असेल त्याच्या परि ।।२।। कसा राहील ‘साठा’ आता मनसोक्त ते जाण्या वाहूनी तृप्त करिल परी तृष्णा तुझी ओंझळभर घेता पिऊनी ।।३।। कुणीतरी आहे पाठीराखा चालत रहा तू […]
दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे भावनेमधली विविध अंगे येऊं लागली […]
अगणित तारे जीव जीवाणूं । अथांग विश्व अणू रेणू ।। रंगरूप हे नेत्री दिसती । भिन्न भिन्न राहूनी जगती ।। रस गंध दरवळे चोहीकडे । जगण्याचा तो मार्ग सापडे ।। हे जर आहे रूप ईश्वरी । बघती त्याला आमुच्या नजरी ।। सुख दु:ख ही त्याची निर्मिती । फिरे सदा आमचे भोवती ।। […]
हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ// तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं […]
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ….१ चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी….२ आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे….३ परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती….४ करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions