नवीन लेखन...

द्रोण काव्य

ह्या सप्त रंगातल्या इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मेघराजा गालात हसा ना — सौ.माणिक शुरजोशी

गोष्ट प्रेमाची…..।

चेहेरा तर खूप सुंदर भेटणं, नक्कीच माझ्यापेक्षा ही … पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला माझी….माझ्या प्रेमाची…..!!! — मयुरी राम विखे

मुक्त छंद – पिपळपान

तुझं-माझं आयुष्य आहे एक पिंपळपान वार्धक्याच्या उंबरठ्यावर शरीर झाले जाळीदार…. भुतकाळात शिरलो की आपण दोघे क्षणार्धात याच पिंपळ वृक्षाखाली बसलो होतो तासनतास…. तारुण्यातली रग होती जगण्यातली धुंदी मोठी सुखी संसाराच्या सारीपाटावर पडली दानं खोटी होती. पानगळीच्या ऋतूत पानगळ झाली जवळ तेवढी फांद्यांची जाळी तेवढी शिल्लक राहिली वहीतलं पिंपळपान तुझं नी माझं गीत गात हलकेच पण जाळीतून […]

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी,   ज्योत प्रेमाची पेटून जाते बाह्यांगाचे आकर्षण परि,   वयांत त्या भूरळ घालते…१, प्रेमामधली काव्य कल्पना,  शरिर सुखाच्या नजीक ती किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती…२, प्रेम हवे तर प्रेम कर तूं,  मूळे असावी अंतर्यामी मना मधली ओढ खरी ती,  येईल अखेर तीच कामीं…३, अंतर्मनातील प्रेम बंधन,  नाते त्याचे अतूट असते देहामध्यें बदल घडूनही, […]

तुझा स्पर्श

सप्त शृंगी गडासी वणीची देवी धावत येते गाईन तुझी ओवी पायरी पायरीस हा तुझा स्पर्श मना मोहवी मनी दाटतो हर्ष बोलले मी नवस साडी चोळीचा आले फेडण्या नित्य ध्यास वणीचा रुप सुंदर तुझे हे मोहविते भक्तासाठीच गडा वस्ती करिते लोळण घेतले मी तुझ्या पायाशी आसुसले मी गं वर मिळण्याशी महती गाईन मी आई अंबाई वणी वासिनी […]

मुक्त कविता

सुर्यास्त जवळ आला पायाखाली रेगाळणारी सावली पाठमोरी झाली पाखरांचा गलका परता परता घरट्यात असा सुचक संदेश देऊ लागला.. शिवारात एकच गडबड पश्चिमेला सुर्य झाला डोगंराआड. पाय गुमाण घराच्या ओलीन अंधार चिरत चुल पेटवली होती तिनं पातेल्यात शिजत होते चार दाने खदखदत आयुष्याचे…. खाऊणघ्या…पिऊन गटा गट पाणी…मोजा चांदणे… काळोखात लुकलुकणारे स्वप्न! आणि झाला उल्कापात बघून सुधा मागणे […]

निसर्गाचे ऋतू सहा

निसर्गाचे ऋतू सहा हे सोहळे आता पहा वसंतात हा बहर सृष्टी फुले ही लहर ग्रीष्म ऋतू त्रासदाई दाहकता फार बाई गेला ग्रीष्म वर्षा आली ही अवनी पाचू ल्याली पानगळ शरदात मजा येई चांदण्यात थंडी पडे हेमंतात उब मिळे शेकोटीत हा गारठा असह्य ही शिशिराची वाट पाही ऋतूचक्र फिरते हे आवडीचे सर्वांचे हे सौ.माणिक (रुबी)

अष्टाक्षरी रचना – वावर (ओवी)

अष्टाक्षरी रचना वावर श्येतकरी ह्यो राबतो वावरात दिनरात बिया टाकीसन तिथं उगीसन झाड येत धनी जाय श्येतामंधी रानी थापते भाकर जाई शेतामंदी बाय घर-दार ह्यो वावर कायी शाल पांघरली वरी घामाचा पाऊस बीज माटीतले पाहा येता,धनी करी हौस काळी माय मागे बीज दान देई लय लय तिले माहा नमस्कार तिच्या पुढं जीव काय श्येवटची ओवी माह्या […]

सव्यंग

दिव्यांग या विज्ञानाची कास धरुनी करू अडथळे सारे पार पुढे जाऊ सदैव पुढती झेंडा रोवूया अटकेपार सव्यंग असलो ,काय झाले जगण्याचा आम्हा अधिकार अव्यंगासम विक्रम मोडू ही आमुची असे ललकार कृत्रिम पाय,श्रवण यंत्र ब्रेल लिपी असे चमत्कार अवयव रोपण हा मंत्र सव्यंगांसाठीच साक्षात्कार सकारात्मक हा उर्जा वायू सळसळतो या सर्वांगात सहानुभूती सदैव टाळू प्रगती करू सर्व […]

प्रश्नोत्तर चारोळी

प्रश्न जय कशाला म्हणतात हो? उत्तर कुणी देणार का? प्रतिस्पर्धि होता पराजित त्यालाच जय म्हणावे का? उत्तर आपला हक्क हस्तगत करणे आक्रमकाला समज देणे नाहीच येता समज,पराभूत करणे अशी जयाची परिभाषा करणे सौ.माणिक (रुबी)

1 165 166 167 168 169 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..