नवीन लेखन...

नववर्ष (हायकू)

*हायकू* नववर्ष *१* सु स्वागतम् द्वि सहस्त्र वीसात हो सुफलाम् *२* गरुड झेप घे या नव वर्षात दे स्वर्ण लेप *३* सुर जुळावे तन-मन-धनाचे सुख लाभावे *४* प्रभा फाकता कलरव हो झाला वर्ष -स्वागता *५* या पायघड्या घालते रे स्वागता आता ये गड्या *६* झाले स्वागत मोहरता लेखणी नव वर्षात — सौ.माणिक शुरजोशी

 देह देव

हाडे, मांस, रक्ताने शरीर बनविले छान सौंदर्य खुलते त्या देहाचे जर असेल तेथे प्राण   प्राण नसे कुणी दुजा हा परि आत्मा हेची अंग विश्वाचा जो चालक त्या परमात्म्याचा भाग   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं प्रेमभरे देह भजावा अंतर बाह्य शुद्धता राखित समर्पणाचा भाव असावा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

उघडेल कधी दरवाजा

उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल, संपतील तणाव चिंता, स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, —- मोल देत कसा नाचेल , भरारी घेत आभाळा, उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना, सतत रुंजी घालत राहील,— इवल्याशा त्याच्या मनात, *मुक्तीचा आनंद भरेल, विश्वास ठेवू तरी कसा, मनी भावना उफांळेल,— सुटली ही भयानक कारा ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां, […]

मैत्रीचे नाते (हायकू)

हायकू -मैत्रीचे नाते मैत्रीचे नाते हे युगानुयुगाचे बालपणीचे लुटू पुटूचे रुसण्या-फुसण्याचे जिवा-भावाचे वर्ग मित्राचे नाते वर्गा-वर्गात हे फुलायचे यौवनातले नाते हळूवार असे हो मैत्रीतले सुख -दु:खाचे नाते गाढ मैत्रीचे ते जपण्याचे — सौ.माणिक शुरजोशी.

भास्करा दिन कालचा काळा

भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या, मध्यभागात येऊन जसा, चंद्रमाने आणला अडथळा ,–!!! काही काळ दर्शना तुझ्या, जीव कासावीस माझा, कोलाहल माजतां उरां, नुरला कुठलाही आसरा,–!!! न्यारी प्रेमाची खुमारी, चंद्राने अशी वाढवतां,— स्वर्ग दोन बोटे राहिला , जशी ग्रहणाची सांगता,–!!! मात देत सकल अंधारा, उगवशील माझ्या राजा, जरी तु होशी झाकोळतां, उणीव नाही तुझ्या […]

तुझे तुलाच देवून मोठेपण

वेडे आम्ही सारे, तुझेच घेवूनी तुला देतो,   त्यातच मोठेपण मिटवतो…१,   जाण आहे याची सर्व जगाला चकमा देतो,   स्वत:लाही फसविता असतो….२,   फूले बागेमधली तोडून ते तुजला वाहतो,   हार त्यांचे करूनी घालतो….३,   गंगेतील थोडे पाणी, अर्घ्य आम्ही तुला देतो,   भक्तीभावाने अर्पण करितो….४,   सारे असूनी तुझे, मीपणा हा सतत राहतो,    परी हा भाव दुजासाठी असतो…५ […]

संन्यस्त अश्वत्थ बनते

आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने ,फुले यांनी, खोडास सतत बिलगावे, झाड लेकुरवाळे असते, तरी किती निस्संग,—!!! एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,–!!! *हिरवे […]

बालपण

बालपण हे खरे जीवन हा जीवा भावाचा काळ हा जीवनातला सुखसमृद्ध बालपणीचा हा मन मौजेचा हसणे नी खिदळणे मंत्र सोप्पा सांगे जगण्याचा नसे मतभेद सारे काही असे नेक नको राग ,लोभ,चिंता खेद तन-मन-धन निरागसतेचा देश बालपण वाटे वृंदावन छोटी शिकवण विसरूनी जा कुशीत बालपण हे खरे जीवन चला गीत गाऊ होऊनी बघू लहान आता ना बालपणात […]

चांदणी मी गगनांतील

चांदणी मी गगनांतील,चमचम,चमचम चकाकती, कोण आहे तोडीस तोड, पुढे यावे अंतराळातुनी,— न कुठला नखरा, न कुठली रंगरंगोटी, का न मानावे देवा, ही त्याचीच किमया मोठी,–!!! रंग आमुचा नैसर्गिक, दुधी म्हणू की पांढरा, लखलखतांना,पुढे-मागे, कसा दिसे आमुचा तोरा,–!!! जेव्हा उगवतो आम्ही, थोडा प्रकाश अवती, चंद्रराजाचा डामडौल पहा, चांदण्या त्यात किती रंगती,–!!! इतरही त्याच्या सर्व सख्या, पट्टराणी त्याची […]

नव वर्ष

या हो स्वागताला उंबरठ्यासी बाराच्या सरता येता जल्लोष झाला//१// दिन उगवला नभात प्रभा फाकल्या संकल्पांचा क्षण उजळला//२// कुनिती,अनिती विस्मरणात गाडल्या आल्या की प्रगती,सुनिती//३// शंखनाद होता हा परिस स्पर्श झाला नाही मिळणार कुठे गोता//४// गुलाबी,शराबी नव वर्षाची पहाट पहा नसेल कुठे खराबी //५// सकारात्मकता असो विचारात सदा वाढो विश्वातली आत्मियता//६// — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

1 164 165 166 167 168 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..