नवीन लेखन...

सुखी रहा तू लाडके

सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।। कन्यारत्न जन्मताच,आनंदलो वाढवले ना लाडात,धन्य झालो बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।। आला हो राजकुमार,नेण्या परी नववधू दिसे कशी,ही गोजिरी माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।। येता दाटुनी कंठ हा,काय करू पाठवणी करतो,कसा सावरू जा निवांत तू,वळू नको माघारी मोद हा […]

क्रौंच पक्षाला मुजरा

कारूण्यामधूनी उगम पावला   आद्य काव्याचा झरा वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे,  मानाचा मुजरा….१, गमविले नाही व्यर्थ प्राण ते,  व्याध बाणा पोटीं टिळा लावला काव्यश्वरीने,  मानाने तुझ्या ललाटी…२, हृदयस्पर्शी जी घटना घडली,  तडफड तव होता कंठ दाटूनी शब्द उमटले,  पद्य रूप घेता….३, उगम पावता काव्य गंगा ही,  वाहू लागली भूलोकी वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका,  अशांचे आली […]

मन माझे बावरे

आई अंबाबाई तू दर्शनाला ये गं तुझ्या भक्तित लिन मी मन माझे बावरे गं सातपुडा डोंगर रांगा तिथेच तुझी वस्ती गं थकला हा जीव माझा दर्शना मी कशी येऊ गं नवस मला फेडायचा जोगवा मला मागायचा गोंधळ तिथे घालायचा जागर मला करायचा मन माझे बावरे गं चुकलं का ,ही भिती गं आशिर्वच घेण्या तुझे मनोमनी आतुर […]

चारोळी – भाकरी साठी वणवण

भाकरी साठी वणवण फिरलो दाही दिशा चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर अशी झाली माझी दशा — सौ. माणिक दिलीप शूरजोशी 

 सहचारीणी

दिपूनी गेले नयन त्या क्षणी बघता तिची सोज्वळ मुर्ती । हाक निघाली अंतःकरणीं तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।   जरी बघीतल्या अनेक सुंदरी ठाव मनाचे हिने जींकले । सहचारीणी ही होईल तुझी अंतरमनी शब्द उमटले  ।।   अनामिक जे होते पूर्वी साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।   […]

महागाई थांब

कांदा नी भाकर किती महागली पोट कसे भरू गळचेपी झाली मेथीची जुडाई पन्नाशीला आली कोथिंबीर लुप्त मी घिरट्या घाली काही भाज्या तर झाल्या महाराणी गातात नेहमी श्रीमंतीची गाणी राब राबतो रे शेतकरी शेता दलाल पदरी माप काहो घेता ज्याचा आहे नफा त्याला द्यानं जरा फुले सुखी वाफा दारी तर तरा महागाई थांब नको शोषू रक्त विनवणी […]

मक्षिकेचे आत्मसमर्पण

उडत उडत एक मक्षिका,  देव घरांत ती शिरली, पुजा साहित्य आणि मूर्तिवरी स्वच्छंदानें नाचूं लागली…१,   धुंदीमध्ये बागडत होती,   मूर्तीच्या ती बसे शिरावरी धूप, गंध आणि सुमनावरूनी,  जाई मध्येच प्रभू चरणावरी…२,   पंख चिमुकले हलवीत ती,  मूर्तीपुढें गांवू लागली प्रसाद दिसतां पंचामृताचा,  प्रभू अर्पिण्यासी झेपावली…३, नैवेद्याच्या क्षीर सागरीं,  आत्मसमर्पण तिने केले प्रभू सेवेत तल्लीन होवूनी,  जन्माचे […]

मायेचा बाप

मायेचा बाप कष्टकऱ्या धाप आम्हाला सुखी माप….१ कर्तव्य फार शिस्तिला हो धार लळा अपरंपार…….२ घराचे छत गावात ही पत उद्योगी पारंगत…….३ खर्च मोजून जावक योजून हौस भरभरून…….४ समसमान वागवतो छान शिकविण्यास रान…..५ अबोल फार महान विचार झाला नाही लाचार….६ करू सन्मान सदा असो भान घरादाराची शान…..७ हा ताणा बाणा भाव मनी जाणा हा संसाराचा कणा….८ — […]

1 168 169 170 171 172 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..