नवीन लेखन...

विरहात

आई तुझ्या विरहात जगते मी आठवात *१* गेलीस नां तू सोडून बालपणी रडवून *२* अनाकाली मी पोरकी इथे सारे हे बेरकी *३* नाही कुणी विचारत संकटे ही सतावत *४* मार्ग मला सापडेना काही केल्या उमजेना *५* प्रयत्न मी करतेच ठेवण्याचा हास्यतेज *६* आता झाले अंतर्मुख जिवनात शोधे सुख *७* बाळ तुझी गुणी पहा स्वर्गात तू सुखी […]

अर्जून दुर्योधन कृष्णाकडे

दोघेही येती एकाच वेळीं श्रीकृष्णाच्या भेटीला अर्जून उभा चरणाजवळी दुर्योधन बसत उशाला…१ प्रथम दर्शनी नेत्र उघडता नजर गेली अर्जूनावरी प्रभूकडे तो आला होता आशिर्वाद त्याचे घेण्यापरी….२ दुर्योधन दिसे बघता पाठी अहंकाराने होता भरला मदत करण्या युद्धासाठी विनंती करि तो हरिला….३ युद्धामध्ये भाग न घेई सांगेन गोष्टी उपदेशाच्या परि सारे त्याचे सैन्य जाई लढण्या दुसऱ्या बाजूच्या…४ विश्वास […]

भाकरी – चारोळी

आज मिळाली रोजंदारी खाऊ घरी भाजी-भाकरी जाता महागाईच्या बाजारी स्वप्न टांगलं खुंटीवरी — सौ.माणिक (रुबी)

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला,  थोटके का भासते झेप घेण्या पंख फूटतां,  हाती येईल काय ते ? उंच हा गिरीराज देखूनी,  शिखर चढावे वाटते चार पावले टाकतां क्षणी,  चढणे सोपे काय ते ? अथांग सागर खोल जरी ती,  डूबकी घ्यावी वाटते जलतरण कला अवगत होता,  सूर मारणें जमेल कां ते? काव्य सरिता वाहात आहे,  ज्ञान गंगोत्री भासते केवळ कविता […]

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे […]

तीन चारोळ्या…

१ – राजहंस बाकावर एकटा तो मागे गरीब बसतो तरी राजहंस आहे श्रेष्ठ बुद्धीत असतो २ – शहामृग आहे पंख भव्य दिव्य नाही उडताच येत देती दिलासा हे पाय धावण्यास बळ देत ३ – गिधाड तोंड वेंगाडती सारे नाव ऐकताच माझे स्वच्छ ठेवी परिसर अरे मित्र आम्ही तुझे — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।।   झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला […]

संस्कार

काहीतरी आहे असे जे …. साथ होते साथ आहे! राख मी होईन तेव्हा ….. . जाईल! म्हटले जात आहे! वय तयाचे कोवळे ……. म्हातारेही तितुकेच आहे! वाढले माझ्यासवे ते …. माझ्यात मुरले आत आहे !!! ……… मी मानसी

वेध गुलाबी थंडीचे

वेध गुलाबी थंडीचे पेटे शेकोटी रात्रीची फड रंगती गप्पांचे पार्टी असते हुर्ड्याची….१ पडे चांदणे रात्रीचे चंद्र निरभ्र आकाशी गुज सांगते मनीचे सखी ही प्रियकराशी….२ उब वाढता तनाची सय घालतो सखीसी आस असे मिलनाची आवतण रजईसी……. ३ निशा अंधाऱ्या रात्रीची साथ मिळे गारव्याची जादू रती-मदनाची प्रित खुले युगलांची……. ४ दिस आले प्रणयाचे रिते चषक मद्याचे वेध गुलाबी […]

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]

1 169 170 171 172 173 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..