नवीन लेखन...

प्रारब्ध – भाग 4

असो. मी शुक्रवारी भायखळ्याला गेलो. आमच्या जुन्या घराच्या जागी आता मोठी इमारत उभी होती. तिथे चौकशी केली तेव्हा आमचे जुने दोस्त आणि शेजारी फर्नांडिस भेटले. मला पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. जुन्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यात मिस्त्रीशेटचाही विषय निघाला. खरंतर नीच काढला. कारण मला तीच माहिती हवी होती. आणि जे समजले ते ऐकून मी थक्क झालो. […]

एका व्यस्त दलालाची प्रेम-कथा

चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय. […]

प्रारब्ध – भाग 3

आजोबांनी करसनकडे फक्त एकदाच पण रोखून पाहिले. काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेनेच करसनला जणू कोणी कानफटात मारल्यासारखे वाटले असावे. तो लगेच तिथून पसार झाला. मिस्त्रीशेटही पहात राहिले, म्हणाले, “अरे आजोबा, मला माफ करा. हे आमचा डिकरा हाये ने करसन, लय खराब हाये. माझ्या मरणाची वाट पहाते साला. माझा लोखंडनो मोठा धंदा हाये. लय इस्टेट […]

कला कशाशी खातात?

मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना. […]

प्रारब्ध – भाग 2

गोष्ट सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझ्या वडिलांची बदली झाली त्यावेळची. बदली झाल्यावर नाशिकहून आम्ही मुंबईला आलो. वडिलांना भायखळ्याला राणीच्या बागेजवळ, आता तिला जिजामाताबाग म्हणतात, ससेक्स रोडला मिस्त्री बिल्डिंगमध्ये सरकारी जागा मिळाली. जागा कसली? एक दुमजली बंगलेवजा घराचा १ल्या मजल्यावरचा अख्खा अर्धा भागच होता तो! दोन मोठे प्रशस्त हॉल. तसंच मोठं स्वयंपाकघर. उंची चांगली बारा पंधरा फूट. मंगलोरी […]

आकाश-खिडकी

लीसन कांचेतून दिसणाऱ्या ताऱ्याला सहज “बिली जॅक्सन” हे नांव देते आणि अखेर त्याच नांवाचा डॉक्टर रूग्णवाहिकेंतून तिला वाचवायला येतो. चेटकीणीचे पाव मधे प्रेमिकेच्या आशेचे अचानक निराशेत परिवर्तन झाले तर ह्या कथेत संपूर्ण दु:खद गोष्टी घडत अखेरचे वळण आशादायी करते.
तरूण कर्तव्यदक्ष डॉक्टर चार चार पायऱ्या ओलांडत जिना चढून जातो रूग्णवाहिकेत तिला खाली ठेवत नाही आणि तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपचार करत असतो. […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा)

नमस्कार, पहिल्यांदाच विज्ञान आणि अध्यात्म वर आधारित काल्पनिक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि तीन भागात आहे. श्री.जयंत नारळीकर सर ह्यांच्या लहानपणी वाचलेल्या विज्ञान काल्पनिक कथा ही ह्या मागची प्रेरणा आहे. सर्वांना हा माझा प्रयत्न आवडेल अशी आशा.. प्रकरण पहिले रोज सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हणणारा समीर आज […]

प्रारब्ध – भाग 1

खंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे. मी एक […]

1 27 28 29 30 31 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..