नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही […]

लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते. किती जादू होती तिच्या हातांत! केवळ आश्चर्यकारक. कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली. मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४३ )

चार महिन्यानंतर आता कोठे विजयला त्याच्या पायाला नक्की काय झाले आहे याचा अंदाज बांधता येऊ लागला होता. चार महिने विजयला पायऱ्या उतरता येत नव्हत्या ! चढता येत होत्या पण वेदना सहन करत !  विजयने काही दिवसापूर्वी त्याच्या आयुष्यातील पहिला एक्सरे काढून घेतला होता. पायाच्या टाचेतील हाड म्हणजे कॅलकॅनिअल स्फुर वरच्या बाजूला जरा वाढलेले दिसले. अँकलमध्ये सूज […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४२ )

एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने […]

दुस-यांच्या नजरेतून (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४१)

“आपला गालिचा फारचं खराब झालाय. जेव्हां जेव्हां एखादा पाहुणा येतो, तेव्हां मला या गालिचाची लाज वाटते.” सौ. मालिनी घाडगे म्हणाल्या. आपल्या बायकोला नेहमी खूष पाहू इच्छिणारे, तिच्याशी जमवून घेणारे श्रीयुत घाडगे गालिचाकडे पहात म्हणाले, “नव्या गालिचाची किंमत साधारण …..” त्यांच वाक्य पत्नीने पूर्ण करावं अशी अपेक्षा करत ते थांबले. सौ. घाडगेनी ते वाक्य पूर्ण केलं, “फक्त […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४१ )

विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची […]

छुपा देवदूत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४०)

आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता. ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला. एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता. मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो. तिच्या […]

आय एम इन अ मिटिंग

माझं देशपांडेंकडे काही काम होतं. मी देशपांडेंना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. देशपांडेंनी फोन घेतला. मी माझं नाव सांगितलं व त्यांना बोलण्यासाठी वेळ आहे का ते विचारलं. “आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर” देशपांडे दबक्या आवाजात उद्गारले. मी फोन बंद केला. देशपांडे मिटिंग आटोपल्यावर फोन करतील या समजूतीवर मी देशपांडेंच्या फोनची प्रतीक्षा करु […]

एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता. छोटी बदके बाजूच्या तळ्यांत आईबरोबर पोहत होती. ती त्यांना पाण्यात खेळ खेळायला शिकवत होती पण त्यांना कांही ते जमत नव्हतं. तीं इकडे तिकडे भरकटत होती. उंदीरमामा म्हणाला, “किती द्वाड मुलं आहेत ! त्यांना कडक शिक्षा कर.” बदकांची आई म्हणाली, “त्याची गरज नाही. पालकांनी संयम ठेवायला […]

एक परीस स्पर्श (भाग – ४०)

सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज  नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा  […]

1 20 21 22 23 24 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..