नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ५१)

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ५०)

काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो.  हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला  उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे … […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते. […]

संधीचं सोनं

विधात्याने सृष्टी निर्माण करताना भर दिला तो विविधतेवर. जगात कोणत्याही दोन गोष्टी समान नसतात. माणसामाणसाचं रुप वेगळं असतं, राहणीमान वेगळं असतं. प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती वेगळी असते. वनस्पतींचे आकार वेगळे असतात, प्रकार वेगळे असतात. संपूर्ण जगात कोणत्याही दोन ठिकाणी कोणासाठीही समान अशी एखादी गोष्ट असते का? सृष्टीतील विविधतेने भारावून गेल्याने आपल्या मनात या प्रश्नाचं प्रथम नकारात्मक उत्तर […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही…  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे. […]

बदल

ओनली थिंग कॉस्टंट इंन धिस वर्ल्ड इज चेंज, असं एक इंग्रजी वचन आहे. जगात कायमस्वरुपी टिकून राहणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल, असा या वचनाचा अर्थ! थोडक्यात जगात कायमस्वरुपी टिकून राहणारं काहीच नसतं, प्रत्येक गोष्ट बदलतच राहते. अवतीभवती कुठेही नजर टाकली की सर्वच गोष्टी कशा बदलतात याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. काही गोष्टी एवढ्या बदलतात […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना  सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी […]

बग्या 

खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं. […]

1 19 20 21 22 23 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..