नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आधुनिक वानप्रस्थाश्रम!

वानप्रस्थासाठी आता वनात जाण्याची जरूरी नाही. वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेवढी निसर्गात भटकंती करावी. घरात निदान छोटी बाग तयार करून त्याची निगा राखावी. सूर्य, चंद्र, चांदण्या पहाव्यात. संगीतात मन रमवावे. कमी खावे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. […]

पार्श्वसंगीत

… तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले. […]

मीरा – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो. हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे. […]

व्हिडिओ कोच

मुंबई सी एस एम टी ला लोकल प्लॅटफॉर्म वर आली होती पण अनाउन्समेंट किंवा इंडिकेटर वर कोणती लोकल आहे त्याची कुठलीच सुचना नव्हती. त्यामुळे फारशी लोकं लोकल थांबायच्या आत आणि थांबल्यावर सुद्धा चढली नाही. मला कल्याणला जायचे असल्याने मी पटकन चढलो आणि विंडो सीट मिळवली. दोन मिनिटात इंडिकेटर वर ती लोकल 6.53 ची कर्जत फास्ट असल्याचे […]

पुस्तकाचं घर

१९९२  म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं. […]

घुस्मटलेले श्वास झाले रे मोकळे- “गोदावरी” !

“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला. […]

व्यवहार

पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते . […]

माणसं जोडणारा गणेशोत्सव

बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या. बर्वे बाईंनी आणि मुलांनी श्री गणेशाची मुर्ती पसंत केली का असे विचारले असता […]

कल्पनाची ‘आयडिया!’

कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या […]

आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी

भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे […]

1 78 79 80 81 82 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..