साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
ब्रह्मगिरी फार उंच पर्वत
वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो. […]
‘वाचेल’ना वाचन?
पुणे हे एके काळचं विद्येचं माहेरघर. त्या काळात सर्वत्र विद्वता नांदत होती. शहरातील मुख्य पेठांमध्ये, डेक्कनला व कॅम्पमध्ये पुस्तकांची मोठी दुकाने दिमाखात उभी होती. या ज्ञानमंदिरांना मी अनेकदा भेटी दिलेल्या आहेत. टिळक रोडवरील नीळकंठ प्रकाशनचं छोटंसं दुकान जातायेता लक्ष वेधून घ्यायचं ते त्या दुकानाच्या पाटीवरील बोधवाक्यामुळे “शब्दकोशातील शब्द येथे सुंदर होऊन भेटतात.’ बरीच वर्षं चालू असलेलं […]
हास्यबँक (बँकेतील गंमती-जमती)
मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत. […]
कसोटी रक्कम हाताळणीची
बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही, […]
कौन बनेगा रोडपती…
अचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या बाबतीत असाच एक किस्सा घडलेला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना काही लाख रुपयांची लाॅटरी लागली. त्या […]
पैसा महात्म्य
‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक, सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते… […]
सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ…!
जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. […]
तुझसा’ नहीं देखा..
शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं.. […]
