नवीन लेखन...

कसोटी रक्कम हाताळणीची

बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला  पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही, मात्र कल्याण शाखेत पहिल्यांदाच रोखपालाचे काम करण्याची जबाबदारी आली, मुळात करोडो रुपये हाताळणी करायची कशी याची मनात घालमेल सुरू झाली, इतरांनी धीर दिला आणि ती जबाबदारी, तो दिवस सुरळीत पार पडला, मग अनेकदा रोखपालाचे काम उल्हासनगर, कल्याण या शाखेत पार पाडले. 2011 मध्ये अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यातील सावदा शाखेत रूजू होऊन जेमतेम आठ-दहा दिवस झाले असतील, प्रबंधक हे काही कारणास्तव शाखेत नव्हते, अधिकारी म्हणून शाखा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर पडली, सावदा शाखेत दररोज किमान दोन ते तीन कोटींची देवाणघेवाण होते.

कॅशियर हा सब स्टाफ म्हणून नुकताच कॅशियर झालेला, तरी देखील दिवसभराचे काम आटोपले, रकमेचा हिशेब करताना कॅशियर अस्वस्थ झाला, त्याने एक लाख रुपये कमी असल्याचे सांगितले, बँकांमध्ये असे प्रसंग नेहमीच येतात, मात्र रक्कम मोठी असल्याने सगळेच अस्वस्थ, वारंवार रक्कम मोजूनही एक लाख रुपये कमीच भरत होते, रात्रीचे आठ वाजले, काय करावे सुचत नव्हते, मात्र त्या शाखेत अनिल खाडे हे तेथील स्थानिक कर्मचारी काम करीत होते, शाखेच्या कामकाजात त्यांचे कायमच महत्त्वाचे योगदान असते, त्यांना आम्ही सर्वजण भिष्मपितामह म्हणायचो.

रक्कम तर हिशेबात दाखविणे गरजेचे होते, त्यांनी स्वतः पन्नास हजार आणि मी स्वतः पन्नास हजार रुपयांची पुर्तता करून त्या दिवसाचे व्यवहार रात्री दहा वाजता पूर्ण केले. मात्र खाडे यांनी त्यादिवशी व्यवहार झालेल्यांना संपर्क करून कोणाला जास्त पैसे गेल्याची माहिती मिळविली आणि रक्कम परत मिळविली. सावदा शाखेत दररोज दोन ते पाच कोटी रुपयांची देवाणघेवाण होते एवढी रक्कम दररोज कूठुन उपलब्ध करायची याचे मोठे आव्हान होते, बँकेची रक्कम वितरण व्यवस्था नागपूर येथे तेथे जाऊन दररोज व्यवस्था करणे शक्य नव्हते. मग कधी भुसावळ, खामगाव, जळगाव, धुळे, अमळनेर येथे सकाळी लवकर जाऊन रकम आणायची आणि ग्राहकांना वितरण करण्याचे दिव्य पार पाडावे लागायचे. त्याच बरोबर सिल्वासा येथे प्रबंधक म्हणून काम करत असतांना रोख रक्कमेचे व्यवस्थापन करणे हे मोठेच जिकिरीचे काम ठरायचे. तेथे देना बँकेकडून कधीकधी रकमेची व्यवस्था व्हायची. रोख रकमेची वाहतूक करतांना कॅश व्हॅन, बंदुकधारी रखवालदार, किती रक्कम आणायची, बँकेची सुरक्षा नसेल तर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधुन सुरक्षा मिळविणे आदि बँकेच्या गाईडलाईन असल्यातरी वेळेवर त्याचे काटेकोरपणे पालन करणे शक्य नसते मग, आपल्याच जबाबदारी वर हे दिव्य पार पाडावे लागते.रकमेचे स्थलांतर होत असतांना, किंवा शाखेतील रकमेचा वीमा उतरवलेला असतोच मात्र कधी काही अनुचित घडले तर त्याला सामोरे जाणे हे बँकेत काम करणाऱ्यांसाठी फारच मनस्ताप देणारे आणि नुकसानकारक ठरते.

सिल्वासा शाखेत कार्यरत असतांनाच पंजाब नॅशनल बँकेत 32 वर्षे सेवा केल्यानंतर 2016 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली मात्र बत्तीस वर्षाच्या काळातील  अनेक बरे वाईट अनुभव, प्रसंग आजही आठवतात, बँकिंग व्यवस्थेतील बदल याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.

-अनंत बोरसे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..