प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती. […]
कृष्णाबाईच्या काठावरच्या त्या आसमंतात त्या भल्या पहाटे सुखद गारवा होता. नदी संथ वाहात होती. धुक्याचा मुलायम पदर नदीवर … शेतशिवारांवर पसरलेला होता. घाटावरच्या देवळातल्या घंटांचा मंद नाद मनाला सुंदर स्पर्श करत होता. काकड आरतीची वेळ समीप येत होती. […]
मडेलिनचा जन्म लियॉन फ्रांस येथे झाला.तिचे वडील एक fabric designer होते. मडेलिनचे लग्न 19 व्या वर्षी मारसेल लवींज बरोबर झाले.तिला दोन मुले झाली गाय आणि नोएल, तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महायुद्धात तुरुंगवास झाला.पण त्याला 1943 मध्ये जर्मनीने सोडून दिले. पुढे त्या दोघांत पटेनासे झाले. […]
घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. […]
एलियनचा जन्म 6 डिसेंबर 1917 रोजी मारसेलीस फ्रांस येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई स्पॅनिश होती. तिचे शिक्षण ब्रिटन व स्पेन मध्ये झाले. तिचे इंग्रजी फ्रेंच, स्पेनिश भाषेवर प्रभुत्व होते. ग्रॅजुएशन झाल्यावर ती लिनसेसटर येथे कपड्याच्या व्यापारासाठी गेली. […]
वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं. […]
१. गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्। वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:॥ अर्थ: गेलेल्या (काळा बद्दल) शोक करू नये. भविष्याचीही काळजी करू नये. बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणे वागतात/ वर्तमान काळात जगतात. २. न कश्चिदपि जानाति कि कस्य श्वो भविष्यति। अतः श्वो करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्॥ अर्थ: उद्या काय होणार ते कोणालाही माहित नाही. म्हणून बुद्धिवान माणसाने उद्याचे […]
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ….. स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला हे गाणं अजरामर आहे. सकाळच्या शांत प्रहरी या गाण्याचे सूर ऐकू आले की आजच्या स्वार्थाने पुरेपूर वेढलेल्या प्रचंड कोलाहलात देखील मन क्षणात प्रसन्न, शांत होतं. एक वेगळीच मंगलता मनाला स्पर्श करू लागते. मन खूप मृदू होतं. धुपाचा गंध दरवळायला लागतो. […]