नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

उगाच काहीतरी – २७

आज सकाळची अतिशय ट्राफिकची वेळ. सिग्नल वर एक कार थांबलेली. श्रीमान ड्रायव्हिंग सिटवर आणि शेजारच्या सिटवर श्रीमती लिपस्टिक लावायला सुरवात करतात. तितक्यात सिग्नल हिरवा होतो आणि कार हळुवारपणे पुढे निघते आणि तेवढ्यात.. डाव्या बाजूचा रिक्षावाला अचानकपणे कारच्या समोरून उजव्या बाजूला वळतो. कारला करकचून ब्रेक लागतो आणि कार झटका देऊन तिथेच थांबते. श्रीमान विंडो खाली करून रिक्षावाल्याच्या […]

उगाच काहीतरी -२६

12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला. आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत […]

लहानपण देगा देवा..

वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो.  आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास  लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तीत होत आहेत. […]

“जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां…..”

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे […]

उगाच काहीतरी – २५

बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही, परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग […]

प्रसन्न

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली. […]

उगाच काहीतरी -२४

काल मी मरता मरता वाचलो. त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे. […]

सोनेरी राजपुत्रास पत्र…

प्रिय सोनेरी राजपुत्रा…. तू काल पहाटे अचानक मनुष्यवस्तीत आलास आणि हकनाक स्वतःचा जीव गमावून बसलास… आम्हाला शहरामध्ये असा वन्यप्राणी आल्याचं खपत नाही, हे कदाचित तुझ्या गावीही नसावं… आम्ही सुट्टीच्या दिवसात बंद गाडीतून अभयारण्यात तुम्हा मंडळींना पहायला येतो, तेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असतो… इथे तर तू आपल्या सवंगड्यांना सोडून चुकून रानटी मनुष्यवस्तीत एकटाच आलास…. […]

उगाच काहीतरी -२३

“Life is like a box of chocolates, you never know what you’re going to get.” –Forrest Gump. आयुष्य खरोखर अगदी असेच आहे. योगायोग आपण चित्रपटात पहात असतो आणि कधी कधी विचार करतो की यार हे कसं शक्य आहे . पण म्हणतात ना reality is stranger than fiction तसे काही उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात दिसतात आणि विश्वास […]

निरोप

निरोप हा शब्दच मुळात प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. ती विलक्षण हृदयस्थ अशी मनसंवेदना असून परस्पर आत्मीयतेची द्योतक आहे. सहवासान मन मनांत गुंतुन जाते हे वास्तव आहे. जीवन हे देखील अतर्क्य आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनुभूतिचे अनेक कंगोरे आहेत. तेथे भावनिक ओढ आहे, तेथे प्रत्येक नात्याची सुंदर जडणघडण आहे. आणि त्यातूनच प्रेम, वात्सल्य, मैत्रभाव अशी लाघवी नाती […]

1 72 73 74 75 76 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..