नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले. […]

घंटा… आपल्या अगदी जवळची…

देवळात प्रथम तान्ह बाळ ऐकतं ,तेव्हा मोठा आवाज ऐकून घाबरून रडतं… नंतर थोडं मोठं झाल्यावर बाबांच्या कडेवरून हात उंचावून घंटा वाजवू शकतं तेव्हा समाधानानी हसतं .. आणि मग घंटा वाजवतच रहातं.. मग उड्या मारून हात पोचतो..घंटा वाजवतो.. नंतर कायम देवळात आलं की भक्तीभावानी घंटा वाजवलीच जाते.. हा एक संस्काराचा भाग होऊन जातो… तो आवाज सांगतो.. मनातले […]

मानसकोंड – शापवाणी

— मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .. ” आज […]

उगाच काहीतरी – २९

काही गोष्टी या ओपन एंडेड सोडलेल्या बरे असतात म्हणजे पुढे काय झालं असणार हे आपण सांगण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या कल्पनेवर सोडलेलं जास्त मजेशीर असतं आणि त्यातच धमाल असते जसं हीच गोष्ट बघा ना…. दिनकर रावांच्या मोठ्या मुलीचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी धाकटीचही लग्न थाटामाटात पार पडलं. दोघींनाही चांगलीच स्थळं मिळाली आणि दोघी मुली […]

आदरणीय तात्यासाहेब

जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !! […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग २

मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर  राजगड मोठ्या  दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते. […]

उणा आनंद…….

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली, “आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….” संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. […]

“जोखीम”

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता. […]

जोडवी – भाग १

विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती… […]

आठवणी गावाकडच्या..।

ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. […]

1 70 71 72 73 74 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..