नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

‘आपलं’ दुकान..

आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. […]

तिबोटी खंड्या

बाहेर प्रथमच आलेल्या पिल्लाचा फोटो काढण्याची संधी मिळेल या आशेने जोर धरला. आणि काय आश्चर्य …! घरट्याच्या बिळाच्या तोंडाशी निळसर पिवळी चोच डोकाऊ लागली. प्रथमच बाहेरचे जग पाहणारे बावरलेले डोळे दिसले. […]

शून्यत्व ……

अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही. […]

 सतीच वाण

या ग्रामीण भागामध्ये 1969सालि करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती. […]

जेष्ठांचा आशीर्वाद….

एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?

रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते. […]

खरा तो एकची ‘धर्म’…

भारतात टीव्ही सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत कमर्शियल जाहिरातींमधील दोन जाहिराती अविस्मरणीय ठरल्या. एक होती निरमा वाॅशिंग पावडरची व दुसरी एमडीएच मसालेची! या मसाल्याच्या जाहिरातीत जो फेटेवाला हसणारा वृद्ध दिसायचा, तो पहिल्यांदा माॅडेलिंग करणारा असेल असं वाटायचं. मात्र पाच दशकं झाली तरी उतारवयातही जाहिरातीत तोच दिसल्यावर खात्री झाली की, हाच ‘एमडीएच’ मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे! […]

जेवण संस्कृती

आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. […]

ड्यूटी ऑफीसर

पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो. […]

जाणीव नव्याने

माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली. […]

‘लर्न अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’

मग मी बुक स्टॉलवर गेलो. विचारले, तुमच्याकडे ते ‘हमखास काळा पैसा मिळवण्याचे 100 मार्ग’ नावाचे पुस्तक आहे का हो?’ तर स्टॉलवाला म्हणाला, ‘आहे. एकच कॉपी शिल्लक उरलीय. माझ्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन मिळवून द्या. पुस्तक देतो’ त्याचा नाद सोडून मी काळा पैसा मिळवण्याचे शिक्षण देणारा एखादा शॉर्ट टर्म कोर्स आहे का म्हणून चौकशी करायला लागलो, तर ‘लन अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’ असा एक कोर्स असतो, असे कळले. […]

1 68 69 70 71 72 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..