नवीन लेखन...

एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

 
आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ….
तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ….
अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे….)
मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो….
सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो….आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना….
हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ….
भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही…..
सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ….
खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे …
नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ….
मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ….
मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे…..
हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ….
#मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत …
#जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ….
मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा….
उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ….
प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते …..
#अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे …
-–नितीन काकड

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 188 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..